Myra ('Pari' In Mazi Tuzi Reshim Gath)  Google
मनोरंजन

Video: लहानग्या परीनं अशी साजरी केली शिवजयंती,दिली अनोखी मानवंदना

'माझी तुझी रेशीम गाठ' या मालिकेत मायरानं साकारलेली परी ही व्यक्तिरेखा सर्वांच्या पसंतीस उतरली आहे.

प्रणाली मोरे

सध्या झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर सुरु असलेली 'माझी तुझी रेशीमगाठ'(Mazi Tuzi Reshimgath) ही मालिका सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांना आवडत आहेत. पण त्यातही सर्वांच्या मनात जिनं विशेष स्थान मिळवलं आहे ते चार वर्षाच्या लहानग्या मायरानं. जी या मालिकेत परीची व्यक्तीरेखा साकारत आहे. खरंतर छोट्या पडद्यावर येण्याआधीच मायराला दूरदूरपर्यंत लोकं ओळखायचे बरं का. आता कदाचित जर आपल्यापैकी कुणाला तिच्याविषयी हे माहित नसेल तर सांगते की मायरा ही बालकलाकार होण्याआधी प्रसिद्ध युट्युबर आहे. तिचा स्वतःचा चॅनल आहे. ज्यावर तिचे अनेक व्हिडीओ पोस्ट केलेले पहायला मिळतात. तिच्या चॅनलचे सबस्काईबर्स लाखोंमध्ये आहेत, तर सोशल मीडियावरही तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. तिच्या व्हिडीओला लाईक्स मिळाले नाहीत तर नवल. अशा या सर्वांच्या लाडक्या युट्युबरचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

आज आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांची ३९२ वी शिवजयंती आहे. तारखेनुसार आलेली ही शिवजयंती संबंध महाराष्ट्रात नव्हे भारतातही अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सोशल मीडियावर तर शिववंदना देण्यासाठी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अशा सगळ्यांनीच आपापली अनोखी पद्धत अवलंबली आहे. यातच एक व्हिडीओ आकर्षित करत आहे,जो आहे छोट्या मायराचा. अर्थातच 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परीचा.

तिनं छानं काठपदराची भरजरी साडी नेसलीय,डोक्यात भगवा फेटा,पारंपरिक दागिने असा साज केलेला दिसत आहे. त्यात ही छोटुली चार वर्षांची चिमुरडी हातात शिवरायांची मूर्ती घेऊन अशा थाटात,रुबाबदार चालीत शिवरायांना मानवंदना देताना दिसली की सर्वच तिचे चाहते अन् पाहणारेही भारावून गेले आहेत. तिच्या चाहत्यांनीही तिनं शिवरायांना दिलेल्या अनोख्या मानवंदनेचं भरभरुन कौतूक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT