Mein Atal Hoon Movie Pankaj Tripathi Lead Role  esakal
मनोरंजन

Mein Atal Hoon : 'मैं अटल हू' अटलजी साकारताना मला... पंकज त्रिपाठीनं शेयर केला 'तो' अनुभव

युगंधर ताजणे

Mein Atal Hoon Movie Pankaj Tripathi Lead Role : भारतीय राजकारणामध्ये ज्या राजकीय व्यक्तिमत्वाविषयी नेहमीच आदरपूर्ण बोललं जातं, त्यांच्या राजकीय आणि धोरणात्मक निर्णयांविषयी सांगितले जाते त्या भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व प्रभावी होते. वक्तृत्व, कवित्व आणि नेतृत्व याबाबत अटलजींनी देशाला वेगळ्या उंचीवर नेले.

बॉलीवूडमध्ये यापूर्वी वेगवेगळ्या राजकीय व्यक्तिमत्वांवर चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या आयुष्यावरील द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट कमालीचा लोकप्रिय झाला होता. त्यानंतर मराठी मध्ये ओम राऊत यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील चित्रपटाची निर्मिती केली होती. आता कंगना भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर चित्रपटाची निर्मिती करत आहे.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

दुसरीकडे मराठीतील प्रतिभावंत दिग्दर्शक रवी जाधव हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकमध्ये व्यस्त आहे. यापूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल झाला होता. त्यानंतर समोर आलेल्या टीझरनं प्रेक्षकांना जिंकून घेतले होते. यामध्ये बॉलीवूडचा प्रसिद्घ अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर बीटीएसचा एक व्हिडिओही शेयर केला आहे.

पंकज यांनी मैं अटल हू च्या फायनल शेड्युलच्या समाप्तीची घोषणा केली आहे. त्यात राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासोबत काम करतानाचा आनंद मोठा होता असेही अभिनेत्यानं म्हटलं आहे. लखनऊमध्ये देखील या चित्रपटाच्या शुटींगचे शेड्युल होते. त्यावेळी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली गेली. त्यांनी या चित्रपटाच्या टीमशी बातचीत केली. यानंतर टीमनं मुंबईतील शे़ड्युल पूर्ण केले आहे.

पंकज यांनी त्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, अटलजी यांच्यासोबतचा प्रवास, ती यात्रा खूप काही देऊन जाणारी आहे. खूप काही शिकवून जाणारी आहे. प्रेरणादायी प्रवास होता हा, अटलजी यांचे व्यक्तिमत्व कमालीचे प्रभावी होते. त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करण्याची संधी मिळते आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे. यावेळी दिग्दर्शक रवि जाधव यांनी देखील पंकज यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.

रवि यांनी अद्भुत दिवस आणि अद्भुत आठवणी असे म्हटले आहे. पंकजची तुमच्यासोबत काम करताना खूप छान वाटले. ते दिवस खूपच सुंदर होते. भानुशाली स्टूडियोज आणि लिजेंड स्टूडियोज यांच्यावतीनं या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे लेखन ऋषि विरमानी आणि रवि जाधव यांचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : राजू शेट्टी, संभाजीराजेंसमोर 'होमपीच'वरच आव्हान; उमेदवार ठरवताना तिसऱ्या आघाडीची लागणार कसोटी

Share Market Today: शेअर बाजार नव्या उच्चांकासाठी सज्ज; कोणते शेअर्स असतील तेजीत?

Tirupati Laddu Recipe: घरीच बनवा खास तिरूपती लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी

Apple च्या आयफोन 16 सीरीजच्या विक्रीला सुरूवात, मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी रांग

Work Stress : अति ताणतणावाचा कर्मचाऱ्यांना धसका, मानसिकतेवर परिणाम; आयटी क्षेत्रात सर्वाधिक प्रमाण

SCROLL FOR NEXT