आजपर्यंत क्रिडा क्षेत्रावर आणि त्यामधील नामवंत खेळाडूंवर अनेक माहितीपट आलेले आहेत. यामागील उद्देश असतो की एखाद्या खेळाविषयीची अथवा त्या खेळात प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूविषयीची माहिती जगातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी. पण आता एक असा माहितीपट येत आहे जो खेळावर तर भाष्य करणारच आहे पण त्या खेळातील गुन्हेगारीवरही प्रकाशझोत टाकणार आहे. हा माहितीपट आहे कुस्ती या खेळावर भाष्य करणारा. ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपट्टू सुशील कुमारची(Sushil Kumar) कथा सांगणाऱ्या या माहितीपटाचं नाव आहे 'दंगल्स ऑफ क्राइम'. नियंता शेखरनं या माहितीपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये कुस्ती आणि त्यातील गुन्हेगारी जगताशी या खेळाचा असलेला संबंध यामध्ये दाखवण्यात आला आहे.
भारतातील पहिले एग्रीगेटेड रिअल लाईफ स्ट्रीमिंग अॅप डिस्कव्हरी प्लसवर हा माहितीपट दाखविण्यात येणार आहे. 'दंगल्स ऑफ क्राइम-द अनटोल्ड ट्रुथ अबाऊट इंडियन रेसलिंग' असे या माहितीपटाचे नाव आहे. भारतातील कुस्ती या खेळाचा विकास आणि या खेळाचा गुन्हेगारीशी जोडलेला संबंध याचा सखोल अभ्यास करून त्यानंतरच हा माहितीपट तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. माजी कुस्तीपट्टू आणि प्रशिक्षक,प्रख्यात क्रीडा पत्रकार तसेच कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी या माहितीपटात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 'दंगल्स ऑफ क्राइम' हा माहितीपट दोन भागांत दाखविण्यात येणार आहे. कुस्तीपट्टू सागर धनखर हत्या प्रकरणी सुशील कुमार सध्या अटकेत आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मागच्या वर्षी २३ मे रोजी सुशीलसह त्याचा मित्र अजयला दिल्लीतील मुंडका येथून अटक केली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.