mia khalifa 
मनोरंजन

फोटोसाठी पोझ देताना मिया खलिफा अचानक उठून ओरडू लागली; व्हिडीओ व्हायरल

सकाळ ऑनलाइन

दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनांवर ट्विट केल्यामुळे पॉर्नस्टार मिया खलिफा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यादरम्यान आता मियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मिया कॅमेरासमोर फोटोसाठी पोझ देताना बसते, पण अचानक जोरात ओरडून पळू लागते. मियाला नेमकं काय झालं, हे सुरुवातीला कळत नाही. पण हा व्हिडीओ दोन- तीन वेळा प्ले केल्यावर मियाच्या ओरडण्यामागील कारण समजू लागतं. फोटो काढण्यासाठी मिया ज्या ठिकाणी बसते, तिथे उन्हाचा चटका पायांना बसल्याने मिया उठून ओरडू लागते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. 

शेतकरी आंदोलनाबाबत केले ट्विट्स
३ फेब्रुवारी २०२१ रोजी शेतकरी आंदोलनावरून दिवसभर ट्विट्सची मालिकाच सुरू झाली होती. विख्यात आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रेहानाच्या ट्विटनंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गचं ट्विट चर्चेत आलं. यांची चर्चा सुरू असतानाच पॉर्न इंडस्ट्रीमधील तीन ओळखीच्या व्यक्तींनी ट्विट करण्यात सुरुवात केली. यामधील पहिलं नाव होतं मिया खलिफा. 'मानवी हक्कांचं उल्लंघन होतं आहे. दिल्लीत त्यांनी इंटरनेट सेवा खंडीत केली', अशा आशयाचं ट्विट मियाने केलं होतं. त्याचसोबत तिने शेतकरी आंदोलनाचा फोटो पोस्ट केला होता.  

प्रियांका चोप्रावर साधला निशाणा
'मिसेस जोनास काही बोलणार की नाही', असा सवाल मियाने प्रियांका चोप्राला विचारला होता.  शेतकरी आंदोलनासंदर्भात बॉलिवूड सेलिब्रिटी का शांत आहेत, असा सवाल मियाने केला होता. याविषयी ट्विट करताना तिने प्रियांकाला टोला लगावला. इतकंच नव्हे तर शेतकरी आंदोलनावरून ट्विट केल्याने ट्रोल झाल्यानंतर, 'आम्हाला जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही टिवटिव थांबवणार नाही', असं म्हणत पेमेंटचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Election : निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील पराभूत; आघाडीत बिघाडीचा दोघांनाही बसला फटका

Latest Marathi News Updates : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या रणनीतीसाठी काँग्रेसची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक

Krishna Khopde : पूर्व नागपुरात ‘कृष्ण कमळ’ ला तोड सापडेना, सलग चौथ्यांदा विजय : कॉंग्रेसनंतर राष्ट्रवादीही हतबल

Rahul Kul: आमदार राहुल कुल यांची अनोखी हॅटट्रीक; मंत्रीपदाचा वनवास कधी संपणार?

Trumpet Voting: पिपाणीने पुन्हा केला तुतारीचा गेम! वळसे पाटील थोडक्यात वाचले; पवारांच्या ९ बड्या नेत्यांना कसा बसला फटका?

SCROLL FOR NEXT