Milind Gawali Esakal
मनोरंजन

Milind Gawali: 'रडायच्या सीनला लहान बाळ रडलं नाही म्हणून..',मिलिंद गवळींनी शेअर केला शूटिंगचा हैराण करणारा किस्सा

काही दिग्दर्शक लहान मुलांना कसे ओरडतात किंवा रडायचे सीन असतील तर लहान बाळांना चिमटे देखील काढतात याचा खुलासा करत मिलिंद गवळींनी खळबळ उडवली आहे.

प्रणाली मोरे

Milind Gawali: 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे सध्या घराघरात अनिरुद्ध या नावाने ओळखले जाणारे मिलिंद गवळी सोशल मीडियावर नेहमीच आपल्या पोस्टच्या माध्यमातून चर्चेत असतात. ते नेहमीच आपले वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक किस्से शेअर करताना दिसतात.

मिलिंद गवळींनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी लहान बाळांसोबत शूटिंग करणं सगळ्याच दिग्दर्शकांना जमत नाही याचा एक किस्सा शेअर केला आहे. यावेळी मिलिंद गवळी यांनी 'आई कुठे काय करते' च्या सेटवर सध्या एक लहान बाळ आहे त्याच्यासोबत सेटवरचे सगळे कसे वागतात,सीन कसे काढून घेतात याविषयी देखील खुलासा केला आहे.

काही दिग्दर्शक लहान मुलांना कसे ओरडतात किंवा रडायचे सीन असतील तर लहान बाळांना चिमटे देखील काढतात याचा खुलासा करत खळबळ उडवली आहे.(Milind Gawali aai kuthe kay karte actor post on shooting with small children)

मिलिंद गवळींनी पोस्टमध्ये लिहिलं आहे,शूटिंग मध्ये सगळ्यात कठीण काम का असेल तर लहान बाळांबरोबर ,लहान मुलांबरोबर ,प्राण्यांबरोबर शूटिंग करणं सगळ्यात कठीण असतं ,
खूप कमी डायरेक्टरांना लहान मुलांबरोबर काम करता येतं, लहान मुलांच्या कलानी घ्यायचं असतं हे त्यांना माहितीच नसतं,
माझ्या दुसऱ्या चित्रपटामध्ये म्हणजे “ वक्त से पहिले “ मध्ये, एक सीन होता , की लहान बाळ रडतय आणि ते बाळ शांत होतं , रडत नव्हतं , एका असिस्टंट ने त्या बाळाला जाऊन चिमटा काढला, ते बाळ कळवळ आणि मोठ्याने रडायला लागला,

माझ्यासाठी तो खूप मोठा धक्का होता, मी त्या असिस्टंटला त्या सिनेमांमध्ये काढायलाच लावलं, त्या अनुभवानंतर मी माझ्या मनामध्ये ठरवून टाकलं की आपण आपल्या बाळाला कधीही या सिनेमा च्या शूटिंगसाठी पाठवायचं नाही.

एकदा जया बच्चन यांची production ची एक सिरीयल “सात फेरे” नावाची , त्यात मी काम करत होतो, एक छोटीशी सहसा वर्षाची मुलगी जिने मराठी मध्ये “कळत नकळत” नावाचा चित्रपट केला होता, ती काम करत होती, मदन बावरिया नावाचे कुणीतरी डायरेक्टर होते, डायलॉग व्यवस्थित बोलता येत नाहीत म्हणून ते तिला इतके ओरडले , की ती मुलगी ओक्सबुकशी रडायला लागली, त्या डायरेक्टरनी त्या मुलीला काढून टाकले, देबू देवधर त्या सिरीयलचे कॅमेरामन होते, मग त्यांची लेक सई तिला बोलवण्यात आलं, सई पण लहान होती , तिचे बाबाचं कॅमेरामन होते , त्याच्यामुळे तिच्यावर काही त्या डायरेक्टरला ओरडता वगैरे आलं नाही. गपचूप सईचं सगळं त्यांना ऐकावं लागतं होत, तिच्या कलानी घ्यावं लागत होतं, ते बघून मला फार आनंद झाला होता.असे खूप बरे वाईट अनुभव आहेत पण

आमच्या “आई कुठे काय करते “ च्या सेटवर आमची जी त्वीशा Twisha आहे,
तिच्या बरोबर आमचं डिरेक्शन डिपार्टमेंट आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट इतक्या छान पद्धतीने तिचं शूटिंग करतात, हे बघून मला फार आनंद आणि त्यांचं कौतुक करावंसं वाटतं, त्विशा चे झोपायचे सीन असेले तर तिच्या झोपेच्या वेळीत ते शूट केले जातात,
ती जागी असेल ,हसत खेळत असेल , तर मग बाकीचे शूटिंग थांबून तिचं शूटिंग केलं जातं, तिचा मूड नसेल तर मग नाहीच करत शूटिंग''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT