Milind Gawali: 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनिरुद्ध बनून सध्या मिलिंद गवळी मोठा गोंधळ घालताना दिसत आहेत. त्यांच्या या ग्रे व्यक्तिरेखेचा प्रेक्षकांना राग येत असला तरी हिच त्यांच्या कामाची पोचपावती म्हणावी लागेल. मिलिंद गवळी यांनी मराठी सिनेमांचा एक काळ गाजवला आहे..त्यांच्या सिनेमांनी तंबू सिनेमांवर राज्य केलेलं आपण पाहिलं असेल. मराठी,हिंदी मालिंकांमध्येही त्यांचं मोठं नाव होतं.
आता 'आई कुठे काय करते' मालिकेमुळे तर त्यांची जोरदार चर्चा रंगलेली पहायला मिळते. मिलिंद गवळी शूटिंगच्या धावपळीतून वेळ काढत सोशल मीडियावरही सक्रिय पहायला मिळतात. ते अनेकदा वाचनीय पोस्ट करतात आणि चर्चेत येतात.
त्या पोस्ट अनेकदा त्यांच्या वैयक्तिक,व्यावसायिक आयुष्याविषयी लिहिलेल्या असतात तर कधी समाजातील एखाद्या मानसिकतेवही ते भाष्य करताना दिसतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट केलीय त्यात चक्क म्हातारपण कसं ऐटीत एन्जॉय करा यावर मस्त पोस्ट लिहिली आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय म्हणालेयत मिलिंद गवळी आपल्या पोस्टमध्ये.(Milind Gawali marathi actor post)
मिलिंद गवळी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत,''Growing old Gracefully
मराठी अनुवाद - आकर्शकपणे वयस्कर होणे ,
Time is ticking all the time for all of us.
And we are getting old every second ,every moment,
वेळ कोणासाठी थांबत नाही,
आणि असं म्हणतात ही वेळेतच सगळं व्हायला हवं, एकदा का वेळ निघून गेली की मग तुम्हाला काहीही करता येत नाही, आणि
दुर्दैव असा आहे की खूप कमी लोकांना वेळेचे महत्त्व आहे,
बऱ्याचशा लोकांना स्वतःच्या तर नाहीच पण दुसऱ्याच्या ही वेळेची अजिबात किंमत नसते''.
''खरंतर वेळ पाळणे punctuality हा एक वेगळाच गहन विषय आहे. यावर तर मला खूपच बोलायचं आहे, पण सविस्तरपणे नंतर
पण आज, Gracefully जगणं म्हणजे काय?
याविषयी थोडं बोलावसं वाटतं,
खूप लोकांना असं वाटतं की आपल्याकडे खूप वेळ आहे,
पण खरंतर खूप वेळ हा कोणाकडेच नसतो,
प्रत्येकाची वेळ ठरलेली असते,
एक कलाकार म्हणून मी ज्यावेळेला माझ्या क्षेत्रातल्या काही लोकांकडे बघतो, आणि मला त्या लोकांचं खूप कौतुक वाटतं त्यांच्याकडे बघून छान वाटतं, आपण पण त्यांच्यासारखं व्हायला हवं किंवा त्यांचे काही गुण आपण घ्यायला हवेत
असं सतत वाटत असतं, केरलाचे मोहनलाल यांच्याबरोबर मी काम केलं आहे मला हा कलाकार फार ग्रेसफुली जगतो आहे असं वाटतं, तसंच मी प्राण साहेबांबरोबर काम केलं होतं,
ज्या वेळेला त्यांच्याबरोबर सिनेमा केला त्यावेळेला त्यांचं वय होतं 85, या वयात सुद्धा ते फार ग्रेस फुल होते, मी निळू भाऊ बरोबर ज्या वेळेला काम केलं त्यावेळेला सुद्धा त्यांचं वय होतं 77-78 खूप graceful होते ते.
पंडित जसराज यांच्याशी माझे खूप जवळचे संबंध होते , वयाच्या 90 मध्ये सुद्धा ते इतकं सुरेख गायचे, स्वर्गातून परमेश्वर येऊन त्यांचं गायन ऐकत बसत असतील असं वाटायचं, माझे वडील Shri Shriram Gawali वयाच्या 84 वर्षात जितक्या उत्साहानेएनर्जीने काम करतात , मला इन्स्पिरेशन inspiration दुसरीकडे कुठेही बघायची गरजच नाही''.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.