milind gawali post 'aai kuthe kay karte' sakal
मनोरंजन

कसं असतं कलाकारांचं 'पडद्यामागचं विश्व' मिलिंद गवळींची खास पोस्ट..

अभिनेता मिलिंद गवळी म्हणजे घराघरात परिचित असणारे 'अनिरुद्ध देशमुख' यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे. मालिकांचे चित्रीकरण करताना कलाकारांचे पडद्यामागचे विश्व कसे असते हे मिलिंद यांनी..

नीलेश अडसूळ

aai kuthe kay karte : मालिका विश्वात सध्या एका मालिकेने प्रेक्षकांना पुरतं वेडं केलं आहे. ती म्हणजे स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते'. (aai kuthe kay karte) आजवर मालिकांमध्ये कायमच मालिकांचे शोषण, मर्यादा, सासुरवास अशा बाजू अधोरेखित केल्या गेल्या. पण या मालिकेने मात्र एका आईचा शोषणापासून ते संघर्ष आणि तिथून यशापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. एक बाई, सासू सासरे पती आणि वेळप्रसंगी मुलांसोबतहि बंड करून ती पुढे जाते, असा प्रेरणादायी प्रवास दाखवला आहे. हि मालिका उत्तरोत्तर अधिकच चर्चेत येत आहे. याच मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे मिलिंद गवळी (milind gawali) यांनी मालिकेचा प्रवास एका व्हिडीओ च्या माध्यमातून उलगडला आहे. सोबतच कलाकारांचं पडद्यामागचं विश्व कसं असतं,याबाबत एक भावनिक पोस्टही त्यांनी लिहिली आहे.

मिलिंद यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ‘आई कुठे काय करते’च्या सेटवरील काही दृश्ये आहेत. या व्हिडीओ सोबत एक भावनिक पोस्ट त्यांनी लिहिली आहे. मिलिंद लिहितात, “ दिवसाच्या सुरुवातीपासून ते रात्रीपर्यंत 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या सेटवर काय घडतं याची ही एक छोटीशी झलक आहे. २०१९ मध्ये हा प्रवास सुरु झाला. आमचे कॅमेरा मॅन राजु देसाई , सेटवरील लाइटमन यांच्या मेहनतीसह कॅमेऱ्याने जेजे टिपलं जातं त्याची पडद्यामागची कसरत मांडणारा हा व्हिडीओ आहे. ‘आई कुठे काय करते’ ही केवळ एक मालिका नसून एक सुंदर जग आहे. ज्यामध्ये दिग्दर्शक, कॅमेरा मॅन, निर्माते, मेकअप, कॉस्च्यूम मन, स्पॉटबॉय या सगळ्यांमध्ये एक सुसंवाद आहे.'

“मला लहानपणापासून शूटिंग पाहायला आवडतं. मला हे स्वप्नांचं जग आवडतं. जरी ही मालिका काल्पनिक असली तरीही आमच्या मालिकेतील सर्व पात्रं ही घरोघरी पोहोचली आहेत. लोकांना आता ही पात्रं आपलीशी वाटतात. २०१९ नोव्हेंबरमध्ये या सगळ्या पात्रांचा जन्म झाला. अरुंधती, संजना, आप्पा, कांचन, आई, यश, अनघा, विमल, अभिषेक, ईशा, आशुतोष, सुलेखा ताई, अविनाश, नितिन शाह, शेखर, कादर, विशाथा, गौरी, विद्याताई आणि अशी बरीच पात्रं, अगदी मी साकारत असलेलं 'अनिरुद्ध देशमुख' हे पात्र देखील. ही नावं २०१९ आधी कधीच ऐकली नाहीत आणि आता अनिरुद्ध किंवा अन्या हे नाव माझ्यासोबत जोडलं गेलं. कदाचित मी आयुष्यभर या नावाने ओळखला जाईल.” असे मिलिंद यांनी म्हंटले आहे. या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अनिरुद्ध देशमुख हे पात्र लोकांना खटकणारे आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी पत्नीच्या स्वातंत्र्याची पायमल्ली करणारा हा अनिरुद्ध आहे. पण त्याची अशी एक बाजू तो प्रकर्षाने मांडत असतो. बायकोविषयी त्याला प्रेम वाटत नसले तरी आस्था मात्र नक्कीच असते. तो मुलांवर, आई वडिलांवर विशेष प्रेम करतो. त्यामुळे माणूस म्हणून त्याच्या वेगळ्या छटा या मालिकेतून पाहायला मिळतात. हे पात्र काहीसे खलनायकी असल्याने अनेकदा चाहत्यांचा रोषही मिलिंद यांना सहन करावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: चंदगड मतदारसंघात शिवाजी पाटीलआघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT