Milind Gawali shared post on aniruddha aai kuthe kay karte sakal
मनोरंजन

Milind Gawali: अरे आता तरी सोड अरुंधतीला.. लग्न झालंय तिचं.. मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत..

अरुंधतीच्या लग्नानंतर अनिरुद्ध साकारणाऱ्या मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट केली आहे.

नीलेश अडसूळ

Milind Gawali: 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अनिरुद्ध या पात्राचा सध्या आपल्या सगळ्यांना नेहमीपेक्षा जास्त राग येत असावा. अरुंधतीच्या लग्नात तो जे काही अडथळे आणत होता किंवा त्यांनतरही त्याचं जे काही हे लग्न तोडण्यासाठी त्यानं केलं हे सगळं ऐकून कसला माणूस आहे म्हणत तुम्ही त्या अनिरुद्धला हिणवतच असाल.

अगदी अरुंधतीची पाठवणी होताना पण त्याने तिला दुखावलं, तिचा अपमान केला. त्याच्या सततच्या या वागण्याला आता घरातले ही कंटाळले आहेत. अगदी मुलगी इशा, सून सगळेच त्याच्या विरोधात बोलतायत. इतके अपमान पचवूनही अनिरुद्ध मात्र तसाच वागतो आहे.

याच सध्या मालिकेतील भागावर अनिरुद्ध पात्र रंगवणारे अभिनेते मिलिंद गवळी व्यक्त झाले आहेत. या संदर्भात त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे.

(Milind Gawali shared post on aniruddha aai kuthe kay karte)

मिलिंद गवळी प्रत्यक्षात अनिरुद्धच्या एकदम विरोधी स्वभावाचा आहे. त्याला स्वतःला माणूस म्हणून हे अनिरुद्ध पात्र आवडत नाही. म्हणूनच आज ते व्यक्त झाले आहेत..

ते लिहितात, ''काय चाललंय अनिरुद्ध ? अरे आता तरी सोड अरुंधतीला , लग्न झालंय तिचं...''

''आता अनिरुद्ध अरुंधतीशी ज्यावेळेला बोलायला जातो आणि त्याचे मुद्दे मांडतो त्यावेळेला मला हा पाकिस्तानचा पंतप्रधान कश्मीर विषयी बोलतोय असं वाटायला लागतं. #divorce (घटस्फोट) बातमी वाचली तर मला हाच सीन डोळ्यासमोर आला''


“पाकिस्तान हर जगह कश्मीर राग अलापता रहता है और हर बार मुंह की खाता है। भारत जानता है कि आतंक को पालने वाला पाकिस्तान किस तरह के नापाक मंसूबे रखता है। भारत ने मुंहतोड़ जवाब देते हुए कहा है कि वह कश्मीर मुद्दे के बजाय पाकिस्तान में मौजूद आतंकियों से मुकाबला करने पर ध्यान दें, जो लंबे वक्त से भारत के जम्मू कश्मीर को निशाना बनाते रहे हैं।”

''याच पद्धतीने अरुंधती अनिरुद्ध ला सडेतोड उत्तर देते त्याचे सगळे मुद्दे खोडून काढते,
अनिरुद्ध ला सल्ला देते की लवकर बरे व्हा, स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे ती बघा, अजून खालच्या पातळीवर जाऊ नका, पण अनिरुद्ध काय सुधारायचं नाव घेत नाही''


''जी गोष्ट आपल्या हातून निसटून गेली आहे त्या गोष्टीच्या मागे पडण्यात काहीच अर्थ नाही हे त्याला कळत नाही, खूपशा माणसांचं असंच होतं, ते मागचं सोडून द्यायला तयार नसतात, त्यांचा अहंकार त्यांना तसं करू देत नाही, मागचं सगळं पुसून नव्याने सुरुवात करायची हिम्मत नसते त्यांच्यात, आणि मग सतत अपमानित होत असतात''

''अनिरुद्ध जितका अपमानित झाला आहे तितका क्वचितच कोणी होत असेल, त्याचा अहंकार ठेचायला सगळ्यांनाच आवडतं, परवाच्या एपिसोडमध्ये अनघा म्हणाली बाबा तुम्ही विकृत आहात, इशा म्हणाली मला तुम्हाला बाबा म्हणायची लाज वाटते, सुलेखाताई म्हणाल्या तुम्हाला सम उपदेशनाची गरज आहे. पण तुम्ही कितीही काहीही त्याला म्हणा तो काय सुधारायचं नाव घेत नाही..'' अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार! उद्धव ठाकरेंची कोल्हापूरात घोषणा, महायुतीवर हल्लाबोल

सुशांत सिंग राजपूतची हत्याच! सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा धक्कादायक दावा; म्हणाली- एम्सच्या डॉक्टरने रिपोर्ट...

IPS Sanjay Verma : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana : तुम्ही बळ दिलं तर... लाडक्या बहीणींना मुख्यमंत्र्यांचं मोठं आश्वासन; डिंसेंबरच्या हप्त्याबद्दलही सांगितलं

Dhule Vidhan Sabha Election 2024 : धुळे जिल्ह्यात बंडखोरांकडून आव्हान उभे; पाचही मतदारसंघांत मतविभाजनाचे डावपेच

SCROLL FOR NEXT