milind ankita 
मनोरंजन

मिलिंदसोबत फॅमिली प्लॅनिंग कधी करणार? अंकिताच्या उत्तराने वेधलं लक्ष

'Ask Me Anything' सेशनदरम्यान चाहत्याने विचारला प्रश्न

स्वाती वेमूल

मॉडेल, अभिनेता आणि फिटनेस फ्रिक मिलिंद सोमणच्या Milind Soman लग्नावरून अनेकदा चर्चा झाली. स्वत:च्या वयापेक्षा मोठ्या असलेल्या जोडीदारासोबत लग्न केल्याने अंकिता कोनवारलाही Ankita Konwar बरेच प्रश्न विचारले गेले. आता अंकिताने या सर्व प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरं दिली आहेत. वयाने मोठ्या असलेल्या माणसाशी लग्न करण्यासंबंधी असलेल्या 'स्टिरिओटाइप'विषयी ती बोलली आहे. ज्याने तिला आनंद मिळतो, नेहमी त्याच गोष्टी केल्याचं अंकिताने यावेळी सांगितलं. इन्स्टाग्रामच्या 'आस्क मी एनिथिंग' या सेशनदरम्यान अंकिताने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. 'वयात जास्त अंतर असलेल्याशी लग्न करू नका, या भारतीय मानसिकतेला तू कसं सामोरं जातेस', असा प्रश्न तिला एका चाहत्याने विचारला. (Milind Somans wife Ankita Konwar on fans question what do you think about family planning)

चाहत्याच्या प्रश्नाला अंकिताने उत्तर दिलं, 'समाजात ते सर्वसामान्य नाही, त्याबद्दल लोक सर्वाधिक बोलतात. हे फक्त भारतापुरतं मर्यादित नाही. माणूस म्हणून, ज्या गोष्टी आपल्याला माहित नाहीत, त्याबद्दल प्रश्न विचारण्याची किंवा घाबरण्याची आपली वृत्तीच आहे. पण कधीकधी या वृत्तीचा वापर कसा करावा किंवा करू नये यात आपण फरक करायला चुकतो. मला ज्या गोष्टींचा आनंद मिळतो, मी नेहमी अशाच गोष्टी केल्या आहेत.' यावेळी अंकिताला रिलेशनशिप, लग्न, फॅमिली प्लॅनिंग याविषयी बरेच प्रश्न विचारण्यात आले होते.

'प्रत्येक नातं हे वेगळं असतं. पण नात्यातल्या काही गोष्टी मात्र समान असतात. एकमेकांविषयी आदर करा, पार्टनरवर विश्वास ठेवा, खुलेपणाने संवाद साधा आणि खूप प्रेम करा. प्रेमाने तुम्ही सर्वकाही जिंकू शकता', असा सल्ला अंकिताने चाहत्यांना दिला. अंकिताला फॅमिली प्लॅनिंगविषयी विचारलं असता ती पुढे म्हणाली, 'आम्ही आधीपासूनच प्लॅन्ड फॅमिली आहोत, पुढचा प्रश्न विचारू शकता.'

मिलिंद आणि अंकिताने २०१८ मध्ये मुंबईत लग्न केलं. मिलिंदपेक्षा अंकिता ही २६ वर्षांनी लहान आहे. वयातील अंतरामुळे या दोघांना अनेकदा ट्रोलसुद्धा केलं गेलं. 'मला असं वाटतं, आपण ज्याच्यावर प्रेम करतो, तो जोडीदार निवडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. या अधिकाराचा संबंध फक्त दोघांमधील प्रेमाशी किंवा भावनांशी असावा, समाजाशी असू नये', असं मिलिंद एका मुलाखतीत म्हणाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT