Milind Soman post news  esakal news
मनोरंजन

Ranveer Singh: 'न्युड फोटोग्राफी' वरुन 14 वर्षे कोर्ट कचेरी करणाऱ्या मिलिंदचा पाठींबा

बॉलीवूडचा उत्साही अभिनेता रणवीर सिंग हा त्याच्या न्युड फोटोशुटनं चर्चेत आला. त्याच्यावर प्रचंड टीकाही झाली.

युगंधर ताजणे

Mlind Soman Reaction on Ranveer: बॉलीवूडचा उत्साही अभिनेता रणवीर सिंग हा त्याच्या न्युड फोटोशुटनं चर्चेत आला. त्याच्यावर प्रचंड टीकाही झाली. बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींनी त्याची बाजू घेतली तर नेटकऱ्यांनी त्याच्यावर (Bollywood celebrity news) कडाडून प्रहार केले. दीपिकानं रणवीरची बाजू घेत त्यात काही चूकीचे नसल्याचे सांगितले. दुसरीकडे काश्मीर फाईल्सच्या विवेक (the kashmir files director) अग्निहोत्रींनी अभिनेत्री बोल्ड फोटोशुट करतात ते आपण पाहतो तर मग एखाद्या अभिनेत्यानं केलेलं का पाहावसं वाटत नाही असा प्रश्न नेटकऱ्यांना केला होता. स्वरा भास्कर, विद्या बालन, आलिया भट्ट यांनी देखील रणवीरला पाठींबा दिला होता.

आता प्रसिद्ध मॉडेल आणि फिटनेस फ्रिक म्हणून लोकप्रिय असलेल्या मिलिंद (ranveer singh photography) सोमणनं रणवीरच्या त्या फोटोंवरुन वेगळी भूमिका मांडली आहे. त्यानं इंस्टावर एक खास पोस्ट शेयर करुन आपल्याला देखील कशाप्रकारे ट्रोल करण्यात आले होते. गेल्या 14 वर्षांपासून आपण कशाप्रकारे कोर्ट कचेऱ्यांना सामोरं गेलो होतो हे त्यानं सांगितले आहे. मिलिंदच्या त्या पोस्टची सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दखल घेतली आहे. त्याच्या त्या पोस्टवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स देखईल दिल्या आहेत. एका जाहिरातीमध्ये अभिनेत्री मधु सप्रे हिच्यासोबत मिलिंदनं बोल्ड फोटोशुट केलं होतं. त्यावेळी त्यावरुन मोठा गदारोळ झाला होता.

रणवीरच्या त्या फोटोशुटवरुन त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. त्यामुळे ते प्रकरण रणवीरसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. मिलिंदनं एक खास स्टोरी शेयर केली आहे. त्यामध्ये तो म्हणतो 25 वर्षांपूर्वी एका जाहिरातीसाठी न्युड फोटोशुट केले होते. त्यावरुन माझ्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. 1995 मध्ये मिलिंद आणि त्याची मैत्रीण मधु सप्रे यांनी ते फोटोशुट केले होते. यानंतर मिलिंद त्याच्या 55 व्या वाढदिवशी गोव्यावरील एका समुद्रकिनाऱ्यावरुन नग्नावस्थेत धावला होता. त्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

milind post

मिलिंद म्हणतो, अजुनही काहीही बदलेलं नाही. आपल्या दृष्टीकोनात फारसा बदल झाला आहे असेही वाटत नाही. लोकांना काय आवडेल आणि काय आवडणार नाही याच्याविषयी आपण सांगु शकत नाही. यावेळी मिलिंदनं खजुराहो लेण्यांमधील काही गोष्टींचा संदर्भ दिला आहे. त्या सुंदर लेण्या आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. तत्कालीन नागरिकांना त्या आवडल्या नसतील. पण राजाला त्या आवडल्या होत्या. आता झालं असं की, सोशल मीडियामुळे आपल्याला सगळ्यांचे ऐकावे लागत आहे. प्रत्येकजण त्याचे मत मांडत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रश्नाला आपल्याला सामोरं जावं लागत असल्याचे मिलिंदचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT