Miss Diva Universe 2023 shweta sharda winning moment know details inside  SAKAL
मनोरंजन

Miss Diva Universe 2023: श्वेता शारदा ठरली भारताची 'मिस दिवा युनिव्हर्स', मिस युनिव्हर्स स्पर्धेत करणार भारताचं प्रतिनिधित्व

मिस दिवा युनिव्हर्स स्पर्धेचा निकाल जाहीर झालाय. या स्पर्धेत श्वेता शारदाने 'मिस दिवा युनिव्हर्स' पटकावला आहे

Devendra Jadhav

मुंबईतील श्वेता शारदा हिने रविवारी मिस दिवा युनिव्हर्स 2023 चा मुकुट जिंकला. डान्सर आणि मॉडेल असलेली श्वेता या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये एल साल्वाडोर येथे होणाऱ्या ७२ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

(Miss Diva Universe 2023 shweta sharda winning moment know details inside)

श्वेता शारदा करणार भारताचे प्रतिनिधित्व

मिस दिवा युनिव्हर्स स्पर्धा रविवारी मुंबईत पार पडली आणि दिल्लीची सोनल कुकरेजा मिस दिवा सुपरनॅशनल 2023 म्हणून उदयास आली. याशिवाय कर्नाटकची त्रिशा शेट्टी मिस दिवा युनिव्हर्स 2023 ची उपविजेती ठरली. कुकरेजा मिस सुपरनॅशनलच्या 12 व्या सीझनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल.

विजेत्या, श्वेता शारदा हिने इव्हेंटच्या ग्रँड फिनालेसाठी सोनेरी आणि तपकिरी चमकदार स्लिट गाऊन परिधान केला होता. विजेत्या म्हणून तिच्या नावाची घोषणा होताच ती भावूक झाली आणि गेल्या वर्षीची विजेती दिविता राय हिने तिचा मुकुट श्वेताला घातला.

कोण आहे श्वेता शारदा?

चंदीगडमध्ये जन्मलेली श्वेता वयाच्या 16 व्या वर्षी मुंबईत आली. फेमिना ब्युटी पेजेंट्स वेबसाईटनुसार, श्वेता शारदाला आर्थिक अडचणींमुळे मुंबईत सुरुवातीला काही वर्षे जगणं कठीण गेले.

22 वर्षीय श्वेताचे संगोपन तिच्या आईने एकटीने केले होते आणि तिने तिच्या आईला तिच्या आयुष्यातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हटले होते.

श्वेताने तिचे शिक्षण CBSE बोर्डांतर्गत पूर्ण केले आहे आणि ती इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेत आहे, असे फेमिना ब्युटी पेजंट्सने म्हटले आहे. एकुणच समस्त भारतीयांतर्फे श्वेताचं अभिनंदन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

SCROLL FOR NEXT