Femina Miss india 2022- Sini Shetty  Google
मनोरंजन

Miss India 2022: कर्नाटकची 21 वर्षीय सिनी शेट्टी बनली 'मिस इंडिया 2022'

'मिस इंडिया 2022' च्या स्पर्धेत राजस्थानची रूबल शेखावत फर्स्ट रनर अप तर उत्तर प्रदेशची शिनाता चौहान सेंकेंड रनर अप ठरलेली आहे.

प्रणाली मोरे

ग्लॅमर इंडस्ट्रीतच नाही अगदी सर्वसामान्यांमध्येही या दिवसाची,या क्षणाची चर्चा रंगताना दिसते. तो क्षण,तो दिवस अखेर आला आणि फेमिना 'मिस इंडिया वर्ल्ड 2022' च्या विजेतीची रविवारी 3 जुलैच्या रात्री उशिरा घोषणा करण्यात आली. भारताला या वर्षीची आपली नवीन ब्यूटी क्वीनं अखेर मिळाली. कर्नाटकच्या सिनी शेट्टीला मुंबईमधील JIO वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये फेमिना 'मिस इंडिया वर्ल्ड'चा मानाचा मुकूट घातला गेला. शेट्टी 21 वर्षाची आहे. तिचा जन्म मुंबईचाच. पण ती कर्नाटकची राहणारी आहे. अकाऊंट आणि फायनान्समध्ये तिनं डिग्री घेतली आहे. आणि आता ती साएफए चे देखील शिक्षण घेत आहे. भरनाट्यमचे शास्त्रशुद्ध शिक्षण देखील ती घेत आहे.(Femina Miss india 2022- Sini Shetty)

'मिस इंडिया वर्ल्ड 2022' स्पर्धेत राजस्थानच्या रुबल शेखावनं फर्स्ट रनर अपचा खिताब जिंकला आहे. रुबल राजस्थानच्या शाही घराण्यातून असल्याचं बोललं जात अहे. रुबलचं म्हणणं आहे की जिंकण्यापेक्षा आपली प्रगती खूप महत्त्वाची असते. आपला आत्मविश्वास दांडगा असल्याचं ती म्हणाली आहे. तिला नृत्य,अभिनय,चित्रकला या कलांमध्ये आवड असून,बॅडमिंटनही ती उत्तम खेळते. या स्पर्धेत उत्तर प्रदेशची शिनाता चौहान सेंकेंड रनर अप ठरलेली आहे.

रविवारी संध्याकाळी 'फेमिना मिस इंडिया 2022' च्या भव्य-दिव्य अशा शो मध्ये ३० राज्यांच्या विनर्सना परिक्षक आणि जगासमोर सादर केलं गेलं. फॅशन डिझायनर अभिषेक शर्माच्या रिसॉर्ट वियर कलेक्शननं डिझाईन केलेले कपडे त्या सर्व सौंदर्यवतींनी परिधान केले होते. वीएलसीसी 'मिस इंडिया 2022' चा ग्रॅंड फिनाले कलर्स एचडी वाहिनीवर 17 जुलै रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ५ वाजता.आपण पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli: ''मी कुणाच्या बापाला भीत नाही, बंटी पाटलांसारखं वागायला लागलो तर...'' बंडखोरीवरुन डिवचणाऱ्याला विश्वजीत कदमांनी भरसभेत झापलं

IND vs SA: कमी सामन्यांमध्ये सुसाट कामगिरी; Arshdeep Singh ने परदेशी मैदानावर घेतले सर्वाधिक ट्वेंटी-२० विकेट्स

Jayanta Patil: " पोर्शे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहूयात", पाहा जयंत पाटलांनी काय केलं? Video Viral

Jhansi NICU Fire: हळहळ! सरकारी रुग्णालयात मोठी आग, 10 नवजात बालकांचा मृत्यू... 35 हून अधिक जणांची सुटका

Women In Games : महिलांमध्येही गेमिंगची क्रेझ....४४ टक्के प्रमाण; छोट्या शहरातही वाढत आहे टक्केवारी

SCROLL FOR NEXT