Rinky Chakma: मिस इंडिया त्रिपुरा 2017 (Miss India Tripura 2017) या स्पर्धेची विजेती रिंकी चकमा (Rinky Chakma) हिचे वयाच्या 28 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून रिंकी ही कर्करोगाशी झुंज देत होती. रिंकीला 2022 मध्ये मॅलिग्नंट फिलोड्स ट्यूमरचे (स्तनाचा कर्करोग) निदान झाले, त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण कर्करोग तिच्या फुफ्फुसात आणि नंतर त्याच्या डोक्यात पसरला. त्याचा परिणाम असा झाला की, तिला ब्रेन ट्यूमर झाला. त्यानंतर रिंकीची तब्येत आणखी बिघडली.
22 फेब्रुवारी रोजी साकेत मॅक्स हॉस्पिटलमध्ये रिंकीला दाखल करण्यात आले. तिथे ती आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर होती. गेल्या महिन्यात, रिंकीनं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिनं चाहत्यांना तिच्या तब्येतीची माहिती दिली. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं होतं,"मला सर्वांना कळवायचे आहे की, मी आणि माझे कुटुंब कठीण काळातून जात आहोत आणि गेली 2 वर्षे नियमित रुग्णालयात राहणे आमच्यासाठी सोपे नाहीये. मी लोकांकडून देणग्या स्वीकारत आहे कारण आता आमची सर्व बचत संपवली आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी उपचार घेत आहे."
3 दिवसांपूर्वी, रिंकीची जवळची मैत्रीण आणि फेमिना मिस इंडिया 2017 स्पर्धेची रनरअप प्रियंका कुमारीने रिंकीच्या उपचारासाठी पैसे गोळा करण्यासाठी रिंकीचा मेडिकलर रिपोर्ट शेअर केला होता.
रिंकीच्या निधनाने तिच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळा. इतक्या लहान वयात रिंकीनं जगाचा निरोप घेतल्यानं अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर अनेकजण पोस्ट शेअर करुन रिंकीला श्रद्धांजली वाहत आहेत. फेमिना मिस इंडियाच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन देखील रिंकीला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं, "अत्यंत दु:खासह आम्ही फेमिना मिस इंडिया त्रिपुरा 2017 विजेती रिंकी चकमा हिच्या निधनाची बातमी शेअर करत आहोत. ती एक विलक्षण स्त्री होती. तिने फेमिना मिस इंडिया 2017 स्पर्धेत त्रिपुराचे प्रतिनिधित्व केले. तिला मिस ब्युटी विथ ए पर्पज ही पदवी देण्यात आली"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.