संपूर्ण जग सध्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची वाट पाहत आहे. सुष्मिता सेन, लारा दत्ता आणि हरनाज संधू या भारतातील तीन महिलांनी आतापर्यंत मिस युनिव्हर्सचा ताज मिळवला आपल्या नावे करत भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.
आता ही स्पर्धा १४ जानेवारीला होणार आहे. यामध्ये जगभरातून 84 महिला सहभागी होणार आहेत. भारतातील दिविता राय ही देखील यात सहभागी होणार आहेत. भारताला त्याच्याकडून खूप आशा आहेत. मिस दिवा युनिव्हर्स ते मिस युनिव्हर्स २०२२ हा तिचा प्रवास आहे. आता आम्ही तुम्हाला दिविता राय कोण आहेत या बद्दल सांगतो.
मुंबईतील रहिवासी दिविता राय हिचा जन्म 10 जानेवारी 1998 रोजी कर्नाटकातील मंगळुरू येथे झाला. दिविता हिने मुंबईच्या सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये शिक्षण घेतले आहे. ती व्यवसायाने आर्किटेक्ट आणि मॉडेल आहे. याशिवाय तिला बॅडमिंटन, बास्केटबॉल, चित्रकला, संगीत ऐकणे आणि पुस्तके वाचण्याची आवड आहे.
दिविताचे वडील इंडियन ऑईलमध्ये काम करतात, त्यामुळे ती देशातील वेगवेगळ्या शहरात राहिली आहे. त्यांनी भोपाळ आणि कोलकाता येथे पाच वर्षे घालवली आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्ती, परिस्थिती, संस्कृती स्वीकारण्याचा गुणही तिच्यात आला. या सर्व गोष्टींमुळे तिचा आत्मविश्वास वाढला. हा आत्मविश्वास तिच्या मॉडेलिंग करिअरमध्येही कामी आला.
दिविताने मिस दिवा युनिव्हर्स 2022 चा किताब जिंकला आहे. जेव्हा दिविताने दिवा युनिव्हर्सचा किताब जिंकला तेव्हा तिला मिस युनिव्हर्स 2021 हरनाज संधूने मुकुट घातला. 2018 मध्ये, दिविताने फेमिना मिस इंडिया ब्यूटी पेजेंट स्पर्धेत भाग घेतला, ज्यामध्ये ती दुसरी उपविजेती होती
हेही वाचा: सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
दिविताने मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या 'नॅशनल कॉस्च्युम राऊंड' मध्ये सोनेरी पंखांनी बनवलेला लेहेंगा घातला होता.. तिचा लूक व्हायरल झाला होता. सोन्याच्या पक्ष्याप्रमाणे परिधान केलेल्या वेशभूषेत दिविता देशाचं प्रतिनिधित्व करत होती. तिचं जीवनातील ब्रीदवाक्य आहे की, "बदलाला घाबरू नका, जीवनाचा स्वीकार करा आणि प्रत्येक क्षण भरभरून जगा."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.