भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या हरनाज संधूनं (Harnaz Sandhu) मिस युनिव्हर्सचा (Miss Universe Sandhu) मुकूट आपल्या नावावर केला. तेव्हापासून तिच्यावर जगभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून हरनाज चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिची बॉलीवूडमध्ये होणारी इंट्री, त्यानंतर आता तिचं न्युयॉर्कमधील घर. (Harnaz Sandhu New home) हे आता चाहत्यांच्या कौतूकाचा विषय ठरताना दिसत आहे. सोशल मीडियावर (Social Media Photo Share) त्यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंटही दिल्या आहेत. Miss universe harnaz sandhu new home new york city
हरनाजनं (harnaz Sandhu) जेव्हा आपल्या नव्या घरात प्रवेश केला तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिची प्रतिक्रियाही व्हायरल झाली आहे. आपल्याला या नवीन घरानं खूप आनंद दिल्याची प्रतिक्रिया तिनं दिली आहे. तिनं आपल्या नव्या अपार्टमेंटमधला तो व्हिडिओ (Video Viral) चाहत्यांसाठी शेयर केला आहे. त्यामध्ये तिनं आपल्या नव्या फ्लॅटचं इंटेरियर शेयर केलं आहे. ते पाहून चाहत्यांनी तिच्या नव्या घराचं कौतूक केलं आहे. 2021 मध्ये मिस युनिव्हर्सचा खिताब हरनाजनं मिळवला. आणि ती चर्चेत आली. त्यामुळे तिला न्युयॉर्कमध्ये एक वर्ष राहण्यासाठी फ्लॅट मिळाला आहे. त्या सेवेचा फायदा तिनं नव्या वर्षापासून घेण्यास सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावर हरनाजनं व्हिडिओ शेयर केला आहे. आपल्या नव्या घराची माहिती देताना हरनाजचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतो आहे. घरातील इंटेरियरचं चाहत्यांनी कौतूक केलं आहे. याशिवाय तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. हॉलमध्ये एक मोठं पेटिंग आहे. त्यामध्ये हरनाजचे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. त्या घरामध्ये प्रवेश करताच तिला 2020 मध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स एंड्रिया मेजाचं पत्रही मिळालं आहे. तिनं तिचं स्वागतही केलं आहे. आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.