mitali mayekar slam netizens who troll her for bikini shoot and insult marathi culture  SAKAL
मनोरंजन

Mitali Mayekar: "तुझ्या बुद्धीच्या पलीकडे...!" नेटकऱ्याने टिका करताच मितालीचं सडेतोड उत्तर म्हणाली,"तुम्ही क्लास घेता का?"

मिताली मयेकरने संस्कृतीवरुन टिका करणाऱ्या नेटकऱ्याला चांगलंच सुनावलंय

Devendra Jadhav

मिताली मयेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री. मिताली मयेकर तिच्या विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. मिताली मयेकरने काही दिवसांपुर्वी केलेल्या बिकीनी फोटोशूटवरुन तिला ट्रोल करण्यात आलं होतं. मितालीने मराठी संस्कृतीचा अपमान केला अशा शब्दात तिच्यावर टिकेची झौड उठवण्यात आली.

अशातच मितालीने ट्रोलर्सला उत्तर देण्यासाठी एक नवीन व्हिडीओ पोस्ट केलाय. मितालीच्या याही व्हिडीओवर तिच्यावर एका युजरने तिच्यावर नाराजी दर्शवली आहे. त्यावर मितालीने सडेतोड उत्तर दिलंय. कमेंटमधला हा संवाद सध्या चांगलाच गाजतोय.

(mitali mayekar slam netizens who troll her for bikini shoot and insult marathi culture)

मितालीचा नवीन व्हिडीओ आणि त्याखाली नेटकऱ्याची कमेंट

मितालीने बिकीनी फोटोशूट केल्यानंतर तिने बीचवर साडी नेसून खास फोटोशूट केलंय. या व्हिडीओला मितालीने कॅप्शन दिलंय की, मी काहीही परिधान केलं तरीही माझी मुळं विसरणार नाहीत (Gentle reminder: I haven’t and would never forget my roots, no matter what I wear.) अभिमान आहे मला, मी मराठी असल्याचा आणि माझ्या मराठी संस्कृतीचा.

मितालीच्या व्हिडीओवर फॅन्सची कमेंट आणि अभिनेत्रीचा रोखठोक रिप्लाय

मितालीच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट केलीय, मराठी संस्कृती तुमच्या बुद्धीच्या आकलनाच्या फार पलिकडे आहे .. नका असे प्रयत्न करू.... बरं तू बिकिनी घाल की नको घालू हा सुद्धा मुद्दा नाही... तुझ्या नवऱ्याला चालत असेल तर दुसऱ्या कुणी तिकडे तोंड उघडायची गरज देखील नाही....पण फक्त कुणी तरी काही तरी प्रोजेक्ट द्यावा ह्या आशेने अंग प्रदर्शन करणाऱ्या so called मराठी अभिनेत्रीची इथे कमी देखील नाही....

यावर मितालीने उत्तर दिलंय की,"संस्कृती आणि काम, कसं आत्मसात करायचं याचे क्लासेस् घेता का तुम्ही काकू? प्लीज घ्या. मला आवडेल जॉइन करायला."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT