Mithun Chakraborty,Narendra Modi 
मनोरंजन

Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्तींना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; म्हणाले, "पंतप्रधान मोदी मला ओरडले कारण..."

Mithun Chakraborty: अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

priyanka kulkarni

Mithun Chakraborty: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आता मी पूर्णपणे बरा आहे, असं मिथुन चक्रवर्ती (Narendra Modi) यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. तसेच मिथुन यांनी त्यांच्या हेल्थ अपडेटबाबत देखील या निवेदनात सांगितलं आहे.

मिथुन चक्रवर्ती म्हणाले, "मी पूर्णपणे बरा आहे"

मिथुन चक्रवर्ती गेल्या दोन दिवसांपासून कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल होते. मिथुन यांना अचानक छातीत दुखू लागले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून अभिनेता डॉक्टरांच्या देखरेखीखाली होता.आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.सोमवारी दुपारी डिस्चार्ज मिळाल्यानंतर मिथुन हे कोलकाता येथील त्यांच्या घरी परतले. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर मिथुन यांनी सांगितले की, "मी पूर्णपणे बरा आहे.मला फक्त माझ्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे लागेल. मी लवकरच कामाला सुरुवात करणार आहे, कदाचित उद्यापासूनच"

मिथुन यांच्यावर का चिडले पंतप्रधान?

स्वतःची काळजी न घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी फोनवर मला फटकारले, असंही मिथुन यांनी सांगितलं. मिथुन चक्रवर्ती म्हणाले- "पंतप्रधान मोदींनी रविवारी मला फोन करून माझी प्रकृतीबद्दल जाणून घेतलं. मी तब्येतीची काळजी घेत नसल्याबद्दल ते माझ्यावर ओरडले"

काल मिथुन यांचा रुग्णालयातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भाजप (BJP) नेते दिलीप घोष (Dilip Ghosh) हे मिथुन यांना गुलाबाचे फूल देताना दिसले.

मिथुन चक्रवर्ती यांना 10 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिथुन यांच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली एमआरआय आणि चाचण्या करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT