mns Amey Khopkar's warning to pakistani actor and producer not come in india SAKAL
मनोरंजन

Ameya Khopkar: तर पाकिस्तानी कलाकारांच्या तंगड्या तोडून हातात देऊ.. अमेय खोपकरांचा इशारा

Devendra Jadhav

Amey Khopkar MNS News: सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष पुन्हा टोकाला गेलाय. दोन्ही देशांमधला तणाव पुन्हा वाढीस लागलाय. या सर्व वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतलीय.

एकिकडे मनसेनी भारत आणि पाकिस्तानच्या वर्ल्डकप क्रिकेट सामनाचा विरोध केलाय. त्यातचं आता मनसे चित्रपट सेनेनी आपला पाकिस्तानी कलाकारांना अजूनही आपला विरोध असल्याची आठवण करून दिलीय.

(mns Ameya Khopkar's warning to pakistani actor and producer not come in india)

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी अलीकडेच ट्विट करत पाकिस्तानी कलाकारांना पुन्हा विरोध दर्शवला आहे.

अमेय खोपकर लिहितात.. भारतात अशांतता माजवण्यासाठी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नियत पाक नाही हे ढळढळीत सत्य आहे.

पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध भारतीयांचे बळी गेले. काहीजण हे विसरले असले तरी आम्ही विसरुच शकत नाही.

अमेय खोपकर पुढे लिहितात.. म्हणून फक्त खेळाडूच नाही तर पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम आहे याची आठवण करुन देतोय.

पाकिस्तानी कलाकार भारतीय सिनेमांमध्ये किंवा सिरीजमध्ये काम करणार असतील तर त्यांच्या तंगड्या तोडून त्यांच्याच हातात देऊ.

त्याची जबाबदारी संपूर्णपणे संबंधित निर्मात्यांची राहील."असा इशारा ट्विटच्या माध्यमातून अमेय खोपकर यांनी दिलाय.

काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी कलाकार बॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनय करत होते. फवाद खान, अली जफर असे अनेक पाकिस्तानी कलाकार बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. परंतु मनसेने केलेल्या आंदोलनामुळे पाकिस्तानी कलाकार भारत सोडून गेले.

अलीकडेच फवाद खानचा लेजेंड ऑफ मौला जट सिनेमा रिलीज होणार होता. परंतु हा सिनेमा ज्यांना पाहायचा असेल त्यांनी पाकिस्तानात जाऊन पाहावा असा कडक इशारा मनसे नेते अमेय खोपकरांनी दिला.

आता अमेय खोपकर यांनी पुन्हा एकदा कडक इशारा दिल्याने बॉलिवूड निर्माते - दिग्दर्शक बॉलिवूड कलाकारांना घेण्याआधी २ वेळा विचार करतील यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'या' शिल्पकाराने घडवलाय राहुल गांधींनी अनावरण केलेला कोल्हापुरातील शिवरायांचा पुतळा; जाणून घ्या रायगड कनेक्शन

ती कुठेय? सगळे आले पण ती नाही दिसली, बिग बॉस मराठीचा प्रोमो पाहून नेटकरी करतायत तिची चौकशी

Bigg Boss Marathi 5 : सूरज की निक्की कोण आहे व्होटिंग ट्रेंड्समध्ये आघाडीवर ? घ्या जाणून या सीजनचे फायनल वोटिंग ट्रेंड्स

Used Car Buying Tips: सणासुदीत रिसेल कार खरेदी करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, होणार नाही फसवणूक

Latest Marathi News Live Updates : वीज दरवाढीचा व्यावसायिकांना ‘शॉक’; प्रतियुनिट 2 रुपये कमी करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT