Pandit Hridaynath Mangeshkar  file
मनोरंजन

पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

गायिका कविता कृष्‍णमुर्ती यांना मोहम्मद रफी पुरस्कार

स्वाती वेमूल

मराठी आणि हिंदीमधील अजरामर गाण्‍यांना चाली देऊन संगीत जगतात आपले अढळ स्‍थान निर्माण करणाऱ्या पंडित ह्रदयनाथ मंगेशकर (Pandit Hridaynath Mangeshkar) यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्‍कार (Mohammed Rafi) तर सुप्रसिध्‍द गायिका कविता कृष्‍णमुर्ती (Kavita Krishnamurti) यांना 2021चा मोहम्‍मद रफी पुरस्‍कार देण्‍यात येणार असल्‍याची घोषणा भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली. आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे चौदावे वर्ष असून एक लाख रूपये रोख, स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, ५१ हजार रूपये रोख आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे.

मोहम्मद रफी यांचे कुटुंबिय आमदार आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात वास्तव्यास असून त्यांच्या उपस्थितीत दरवर्षी हा पुरस्काराचा शानदार सोहळा रंगशारदा येथे पार पडतो. गेल्या तेरा वर्षात मोहम्मद रफी यांच्या सोबत काम केलेल्या अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावर्षी पंडित ह्रदयनाथ मंगेशकर आणि कविता कृष्‍णमुर्ती यांना मोहम्मद रफी पुरस्कार जाहीर करताना आपल्याला आनंद होतो आहे, या दोघांचेही संगीत जगतात मोठे योगदान असून त्‍यांचा सन्‍मान करण्‍याची संधी आम्‍हाला मिळाली याबद्दल आमदार आशिष शेलार यांनी आनंद व्‍यक्‍त केला आहे.

वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे २४ डिसेंबर रोजी दरवर्षी प्रमाणे हा पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी ६.०० वाजता सुरू होणार असून राज्‍यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्‍या हस्‍ते यावर्षी या पुरस्‍काराचे वितरण करण्‍यात येणार आहे. यावेळी प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणीतर्फे फिर रफी या बहारदार मैफिलीत ख्यातनाम गायक श्रीकांत नारायण, सरिता राजेश हे मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन संदीप कोकीळ करणार आहेत. कोरोनाचे नियम पाळून नाट्यगृहाच्‍या पन्‍नास टक्‍के क्षमतेने रसिकांना प्रवेश दिले जाणार आहेत.

यापूर्वी संगीतकार आनंदजी, गायक अमीत कुमार यांच्यासह ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर, शमशाद बेगम, संगीतकार रवी, शैलेंद्र सिंग, नौशाद अली, प्यारेलाल, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, खय्याम, मरणोत्‍तर श्रीकांत ठाकरे, अशा विविध मान्यवर कलावंतासह ख्यातनाम निवेदक अमिन सयानी यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Ambernath Assembly Election 2024 Result Live: अंबरनाथमध्ये बालाजी किणीकरांचा विजयी चौकार; शिवसेनेचे राजेश वानखेडे चितपट

SCROLL FOR NEXT