Monty Panesar Comment On Lal Singh Chaddha आमिर खान (Aamir khan) आणि करीना कपूर खान यांचा लाल सिंह चड्ढा (Lal Singh Chaddha) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला तेव्हापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एवढेच नाही तर सोशल मीडियावर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू आहे. चित्रपट पाहिल्यानंतर इंग्लंडचा माजी क्रिकेटर मॉन्टी पानेसरही (Monty Panesar) संतापला आहे. पानेसरने ट्विटरवर या चित्रपटाबद्दल संताप व्यक्त केला आहे.
लाल सिंग चड्ढा हा १९९४ सालचा हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचा रिमेक आहे. ज्यामध्ये कमी बुद्धी असलेली व्यक्ती यूएस आर्मीमध्ये प्रवेश करते. व्हिएतनाम युद्धाची गरज पूर्ण करण्यासाठी अमेरिकन सैन्य कमी बुद्ध्यांक असलेल्या व्यक्तीला सैन्यात भरती करीत असल्याने हॉलिवूड चित्रपटाला अर्थ आहे, असे मॉन्टी पानेसर (Monty Panesar) म्हणाला.
पानेसरने (Monty Panesar) ट्विटरवर या चित्रपटाबद्दल संताप व्यक्त केला आहे. मॉन्टी पानेसरच्या मते हा चित्रपट भारतीय लष्कर (Indian Army) आणि शिखांचा (Sikh) अपमान करतो.
पानेसरने ट्विट करीत लिहिले, चित्रपटात शीख आणि भारतीय लष्कराचा अपमान करण्यात आला आहे. पानेसरने #BoycottLalSinghChadda देखील वापरला आहे. पानेसर हा स्वतः शीख आहे. त्यांचे पालक भारतीय आहेत. पानेसरने इंग्लंडकडून ५० कसोटी आणि २६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान, त्याने दोन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे १६७ आणि २४ विकेट्स घेतल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.