Most Searched People 2023 esakal
मनोरंजन

Most Searched People 2023: 'गुगल'वर सर्वाधिक सर्च झालेला 'सेलिब्रेटी' कोण, त्या यादीत कोणकोणते 'भारतीय'?

युगंधर ताजणे

Most Searched People 2023 - मनोरंजन विश्वातील अशा सेलिब्रेटींची नावं समोर आली आहेत ज्या नावांचा सर्वाधिक वेळा शोध घेतला गेला. त्यांना गुगलवर सर्वाधिक सर्च मिळाला. वर्षाच्या अखेरीस नेहमीच वेगवेगळ्या घडामोडींची चर्चा रंगू लागते. सर्वाधिक चर्चेतील चेहरा, चित्रपट, चर्चेतला विषय, ट्रेडिंग गाणं, रंगलेला वाद...यावर चाहत्यांच्या, नेटकऱ्यांच्या चर्चा होताना दिसतात.

गुगलनं दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील मोस्ट सर्च पीपल ची यादी प्रसिद्ध केली आहे. चाहत्यांना देखील या वर्षीचा सर्वाधिक सर्च सेलिब्रेटी कोण आहे, याची उत्सुकता होती. खरं तर मोस्ट सर्च पीपल आणि मोस्ट सर्च अॅक्टर्स यामध्ये ते नाव कॉमन असल्याचे दिसून आले आहे. तुम्हाला वाटेल ते नाव प्रियंका चोप्राचं, आलिया भट्टचं किंवा आणखी कोणत्या अभिनेत्रीचं असेल, पण तसं नाही..

गुगलनं वेगवेगळ्या कॅटगिरीमध्ये ती यादी प्रसिद्ध केली आहे. ग्लोबल लेव्हलवर त्या अभिनेत्रीची सर्वाधिक चर्चा होती. तिच्या फोटोंना, व्हिडिओला तसेच तिच्याविषयीच्या बातम्यांना देखील सर्वाधिक प्रतिसाद मिळाल्याचे त्या रिपोर्टमधून समोर आले आहे. ती काही हॉलीवूडची अभिनेत्री नसून बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या लग्नाची चर्चा बराच काळ गुगलवर ट्रेंड करत होती.

गुगलनं सांगितलं तिचं नाव..

ती अभिनेत्री दुसरी -तिसरी कुणी नसून कियारा अडवाणी आहे. या वर्षी सर्वाधिक चर्चा कियाराची झाली असे गुगलच्या त्या रिपोर्टमधून समोर आले आहे. या वर्षी टॉप ट्रेडिंगमध्ये कियाराची चर्चा होती. त्या टॉप सर्चिंग ट्रेंड लिस्टमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, एल्विश यादव, शुभमन गिल यांची नावंही आहेत. पण ग्लोबल लेव्हलवर सर्वाधिक सर्च मिळालेली अभिनेत्री कियारा ही आहे. इंडियन सेलिब्रेटी म्हणून तिचे नाव घेतले जात आहे.

गुगलच्या यादीत सर्वाधिक काळ सर्च केले गेलेले सेलिब्रेटी माहितीये?

कियारा अडवाणी, शुभमन गिल, रचिन रविंद्र, मोहम्मद शमी, एल्विश यादव, सिद्धार्थ मल्होत्रा, ग्लॅन मॅक्सवेल, डेव्हिड बॅकहॅम, सूर्यकुमार यादव, ट्रेविड हेड या नावांचा समावेश आहे.

गुगलवर सर्वाधिक सर्च झालेले अॅक्टर्स कोण माहितीये?

जेरेमी रेनर, जेन्ना ऑरटेग, इचीकवा इन्नोसुक ४, डॅनी मास्टरन, पेड्रो पास्कल, जेमी फॉक्स, ब्रेंडन फ्रासर, रसेल ब्राँड, कियारा अडवाणी, मॅट राईफ,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshwardhan Patil: सुनेत्रा पवारांच्या पराभवामागे हर्षवर्धन पाटलांचा अदृश्य हात... तुतारी हातात घेताच केला मोठा खुलासा

Ratan Tata Health Update: रतन टाटांची तब्येत बिघडली? सोशल मिडियावर पोस्ट करून केला अफवेचा खुलासा

Nashik : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे केरळहून आलेल्या 10 मुस्लिम तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : दसऱ्यानंतर राहुल गांधी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; येथे घेणार सभा

Raj Thackeray Nashik Daura : महाआघाडी-महायुतीवर जनता नाराज, तुम्‍हाला विजयाची संधी, राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT