murder mubarak  sakal
मनोरंजन

Movie Review: रहस्याने गुंतवून ठेवणारी कथा - मर्डर मुबारक

हा चित्रपट सस्पेन्स आणि काॅमेडीने भरलेला आहे | मर्डर मुबारक हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफाॅर्मवर प्रदर्शित झाला आहे|This movie is full of suspense and comedy The movie Murder Mubarak has been released on the OTT platform Netflix

Santosh Bhingarde

दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी काॅकटेल, फाईडिंग फॅनी, अंग्रेजी मीडियम असे काही चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांचा अॅंग्रेजी मीडियम हा चित्रपट सन २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये दिवंगत अभिनेता इरफान खानने मुख्य भूमिका साकारली होती.

त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम दाद दिली आणि त्यानंतर आता त्यांचा मर्डर मुबारक हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफाॅर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सस्पेन्स आणि काॅमेडीने भरलेला आहे.

कलाकारांची भली मोठी फौज असलेला, सोबतच रहस्याने गुंतवून ठेवणारा व विनोदाची उत्तम पेरणी करणारा असा हा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा दिल्लीतील राॅयल क्लबमध्ये घडणारी आहे. या क्लबमध्ये येणारी मंडळी ही श्रीमंत कुटुंबातील असतात. अगदी चित्रपट तारे-तारकांपासून ते उद्योगपतीपर्यंत अनेक जण या क्लबला भेट देत असतात.

किंबहुना या क्लबमध्ये येणे हा गर्भश्रीमंतांना आपला एक प्रकारचा सन्मानच वाटत असतो. याच क्लबमध्ये दिवाळीची पार्टी सुरू असते. या पार्टीमध्ये तारे-तारकांपासून ते उद्योगपती तसेच राजे-महाराजे अशी सगळीच मंडळी सहभागी झालेली असतात. अशातच एका मुलीच्या किंकाळण्याचा आवाज येतो आणि पाहतात तर काय लिओ मॅथ्यू (अशिम गुलाटी)चा व्यायाम करताना मृत्यू झालेला असतो. त्यामुळे सगळ्यांच्या मनात घबराट निर्माण होते.

हा एक अपघात असावा असे क्लबचे अध्यक्ष (देवेन भोजानी) पोलिस अधिकारी असलेल्या भवानी सिंग (पंकज त्रिपाठी) यांना सांगतात. भवानी सिंग आपल्या परीने तपासाला सुरुवात करतात. कारण हा अपघात नसून कुणी तरी रचलेले सुनियोजित असा कट आहे अशी त्यांची खात्री पटते.

साहजिकच त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या भोवती संशयाची सुई फिरते. भवानी सिंग एकेकाची चौकशी करायला सुरुवात करतात. त्यातूनच वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर येतात. मग ते या घटनेचा छडा कसा लावतात याचे रहस्य या चित्रपटात दडलेले आहे आणि चित्रपटाच्या क्लायमॅक्सला ते उघड होते. हा चित्रपट अनुजा चौहान 'क्लब यू टू डेथ' या पुस्तकावर आधारित आहे. अनुजा चौहान यांच्यासह गझल धालीवाल, सुप्रतीम सेनगुप्ता यांनी संयुक्तपणे या चित्रपटाचे लेखन केले आहे. चित्रपटाच्या कथानकामध्ये अनेक टर्न आणि ट्विस्ट आहेत. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर चित्रपट खिळवून ठेवणारा झाला आहे. दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी कलाकारांची मोठी फौज घेतली आहे आणि प्रत्येकाला चांगले फुटेज दिले आहे.

चित्रपटातील रहस्य शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत. पंकज त्रिपाठी, डिम्पल कपाडिया, सारा अली खान, करिश्मा कपूर, विजय वर्मा, टिस्का चोप्रा, संजय कपूर, बिजेंद्र काला, देवेन भोजानी अशा सगळ्याच कलाकारांनी सहजसुंदर अभिनय केला आहे. पंकज त्रिपाठी असे कलाकार आहेत की त्यांना कोणतीही भूमिका दिली तरी ते त्याचे सोने करतात. भवानी सिंग या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतही त्यांनी अशीच कामगिरी केली आहे.

पोलिस अधिकारी आहे म्हणून आक्रस्ताळेपणा न करता अत्यंत खुबीने त्यांनी या गुन्ह्याची उकल केली आहे. सारा अली खानने बांबी तोडीच्या भूमिकेत आपली छाप छान पाडली आहे. तिच्या भूमिकेला विविध छटा आहेत. करिश्मा कपूरचे चित्रपटातील कमबॅक यशस्वी झाले आहे असेच म्हणता येईल.

कुकी कटोचच्या भूमिकेत डिंपल कपाडिया भाव खाऊन गेली आहे तसेच रोशनी बत्राच्या भूमिकेत टिस्का चोप्रा, रणविजय सिंगच्या भूमिकेत संजय कपूर आणि आकाश डोगराच्या भूमिकेत विजय वर्माने आपला ठसा चांगला उमटविला आहे. संगीतकार सचिन जिगरने संगीत दिले आहे आणि ते कथानकाला साजेसे असेच झालेआहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. तरीही काही बाबी खटकणाऱ्या आहेतच. चित्रपटातील काही दृश्ये ही अतार्किक आहेत. परंतु रहस्यामध्ये गुंतवून ठेवणारी कथा असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री आहे आणि ती शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी अशीच झाली आहे.

साडेतीन स्टार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT