Tejaswini Pandit On Record MPs Suspended: संसदेचं हिवाळी अधिवेशन यंदा वेगवेगळ्या मुद्द्यांवर गाजत आहे. तर यंदाचे हिवाळी अधिवेशन हे खासदारांच्या निलंबनामुळे चर्चेत आलं आहे. गेल्या तीन दिवसांत जवळपास 141 खासदारांचं निलंबन करण्यात आले आहे. संसदेत गोंधळ घातल्याप्रकरणी या खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. मंगळवारी आणखी 49 खासदारांचं लोकसभा अध्यक्षांनी निलंबन केल्याने वातावरण जास्तच तापलं.
लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातून आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन करण्यात आल्याने अनेक स्तरावरुन यावर प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेक राजकिय नेत्यांनी याला हुकूमशाही म्हटलं आहे. आता त्यात अभिनेत्री तेजस्विनी पंडितने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास? असा सवाल तिने तिच्या पोस्टमधून केला आहे. सुप्रिया सुळेंच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ शेअर करत तेजस्विनीने ही पोस्ट शेयर केली आहे.
हा व्हिडिओ शेयर करत तेजस्विनीने लिहिले की, "चला बिलं पास करुन घ्या पटापट, मेजॉरिटी तर आधीपासून होतीच, आता तर विरोध करायला कुणी नाही…! लोकशाही बसली धाब्यावर! हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास?"
सध्या तेजस्विनी पंडितची ही पोस्ट सोशल मिडियावर चर्चेत आली आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तेजस्विनी पंडित बद्दल बोलायचं झालं तर ती नेहमीत तिच्या वक्तव्य आणि पोस्टमुळे चर्चेत असते.
ती अनेक सामाजिक आणि राजकिय मुद्यावर भाष्य करत असते. ती मनसे पक्षाला समर्थन करत असते. तेजस्विनी पंडित सोशल मिडियावरही सक्रिय असते. सध्या ती 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.