Former Mrs India Perfectionist Alleges Pressurized for Change Religion : द केरळ स्टोरीनं सध्या देशभरामध्ये वेगळेच वातावरण निर्माण केले आहे. पाच मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. अशातच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
एका मिस युनिव्हर्सच्या मॉडेलनं आपल्याला मुस्लिम धर्म स्विकारण्यासाठी दवाब आणला जात असल्याचे म्हटले आहे. द केरळ स्टोरीमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन धर्मीय मुलींना कशाप्रकारे इस्लाम स्विकारण्यासाठी बळी पाडले जाते आणि त्यांना इसिस स्विकारण्यासाठी आग्रह केला जातो, हे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. अशातच समोर आलेल्या मॉडेलच्या बातमीनं पुन्हा वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.
Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
देशाची राजधानी दिल्लीमध्ये राहणाऱ्या त्या मॉडेलनं म्हटलं आहे की, मला मुस्लिम धर्म स्विकारण्यासाठी दबाव आणला गेला. २०१७ मध्ये एका मुस्लिम व्यक्तीकडून मला तो आग्रह केला जात होत. त्या मॉडेलनं अजमत नावाच्या व्यक्तीवर तो आरोप केला आहे. आपण पहिल्यांदा या गोष्टीची माहिती कुटूंबियांना दिली. आणि पोलिसांकडे तक्रारही दिली आहे.
पीडितेविषयी सांगायचे झाल्यास ती मिस इंडियाची प्रसिद्ध मॉडेल असून आरोपी हा एक तबला वादक आहे. तो दिल्लीतील लक्ष्मीनगरमध्ये राहणारा आहे. एबीपीनं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले की, ती मॉडेल शीख धर्मिय आहे. आणि व्यवसायानं मॉडेल. तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे. तिला एक मुलगा देखील आहे. २०१६ मध्ये ती फेसबूकच्या माध्यमातून अजमत नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आली. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी लिव्ह इन मध्ये राहण्यास सुरुवात केली. अजमतनं तिचे फोटो आणि व्हिडिओ शुट केले होते.
मॉडेलनं अजमतवर आरोप केले आहेत की, २०१७ पासून त्यानं आपल्याशी लग्न करुन मुस्लिम धर्म स्विकारावा म्हणून आग्रह केला होता. इस्लाम स्विकारुन मला बुरखा परिधान करावा लागेल. नमाज अदा करावा लागेल. असे तो म्हणाला होता. २०१८ मध्ये मी त्याच्याशी संबंध तोडले. पण तो मला ब्लॅकमेल करत राहिला. असा आरोप त्या मॉडलेनं केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.