mukesh rishi as afjal khan in sher shivraj movie  google
मनोरंजन

मुकेश ऋषी साकारणार अफजलखान, म्हणाले.. शिवाजी महाराज होते म्हणून भारताकडे..

दिगपाल लांजेकर दिग्दर्शित 'शेर शिवराज' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला यावेळी 'अफजल खाना'ची भूमिका कसरणारे मुकेश ऋषी म्हणाले..

नीलेश अडसूळ

Digpal lanjekar : सध्या ऐतिहासिक चित्रपटांचे वारे जोरात वाहत आहेत. त्यातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आणि स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांची संघर्षगाथा दाखवण्याकडे अनेकांचा कल आहे. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याने काही वर्षांपूर्वी शिवचरित्रावर आठ चित्रपटांची मालिका अष्टक करणार असल्याची घोषणा केली होती. सध्या त्यातले तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून चौथे पुष्प लवकरच प्रेक्षक भेटीसाठी सज्ज झाला आहे.

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ नंतर आता लवकरच त्यांचा आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. ‘शेर शिवराज’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 'येळकोट देवाचा' हे गाणे देखील प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफझलखानाचा खात्मा, त्याचा इतिहास या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला.

महाराजांची गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कपटी डाव आणि त्यानंतर महाराजांनी खानाचा बाहेर काढलेला कोथळा याची छोटीशी झलक 'शेर शिवराज' (sher shivraj )च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात सादर करण्यात आली, हे दृश्य पाहून उपस्थितांच्या अंगावर काटा आला. या चित्रपटात अफजलखानाची भूमिका कोण साकारणार, याची उत्सुकता गेले अनेक दिवस साऱ्यांनाच लागली होती. अखेर त्याचा उलगडा झाला. बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मुकेश ऋषी (mukesh rishi) हे अफजलखानाची भूमिका साकारणार आहेत.

अफजल खानाचे अक्राळ विक्राळ रूप त्यांनी लिलया साकारले आहे. त्यांच्या लूकची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. यावेळी दिग्दर्शक दिगपाल लांजेकर याने चित्रपटाचा प्रवास उलगडला. चित्रपटाच्या संगीताविषयी संगीतकार देवदत्त बाजी, गायक अवधूत गांधी, जुईली जोगळेकर यांनी गीतरचनेच्या आठवणी सांगतानाच त्याची सुरेल झलकही सादर केली. तर मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, मृण्मयी देशपांडे, विक्रम गायकवाड या कलाकारांनीही आपले अनुभव सांगितले.

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर उभी राहणारी ही व्यक्तिरेखा साकारण्याचं भाग्य मला मिळालं याचा मला आनंद आहे. विशेष म्हणजे ज्याच्या ध्यासात छत्रपती शिवाजी महाराज आहेत अशा कल्पक आणि अभ्यासू दिग्दर्शकासोबत काम करताना खूप काही शिकायलामिळालं.' अशा शब्दात अभिनेते मुकेश ऋषी यांनी अनुभव व्यक्त केला. विशेष म्हणजे 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दराऱ्यामुळेच भारताकडे वाकडया नजरेने बघण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही,' असे महत्वाचे विधान मुकेश यांनी केले.

शिवचरित्रातील एक यशस्वी गाथा ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या रुपाने २२ एप्रिलला मोठया पडदयावर येणार आहे. ‘शेर शिवराज’ चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर (chinmay mandlekar) छत्रपती शिवाजी महाराज तर बलाढ्य अफज़लखानाच्या रुपात मुकेश ऋषी त्यांच्यासोबत मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, वर्षा उसगांवकर, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, आस्ताद काळे, वैभव मांगले, सुश्रुत मंकणी, दीप्ती केतकर, माधवी निमकर,ईशा केसकर, रिशी सक्सेना, अशी कलाकारांची तगडी फौज पहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: चंदगड मतदारसंघात शिवाजी पाटीलआघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT