shah rukh khan Instagram
मनोरंजन

'निंदा करनार्‍याचंबी डोळं पांढरं व्हत्याल'; मराठी अभिनेत्याची शाहरुखसाठी खास पोस्ट

या अभिनेत्याची ही पोस्ट एकदा वाचाच!

स्वाती वेमूल

बॉलिवूडचा 'किंग' अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या Shah Rukh Khan वाढदिवसानिमित्त जगभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शाहरुखच्या अशाच एका चाहत्याने त्याच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. हा चाहता आहे 'मुलगी झाली हो' या मालिकेतील अभिनेता किरण माने. एक माणूस म्हणून शाहरुख कसा आहे, याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. 'आपन ऐर्‍यागैर्‍यांना डोक्यावर घेत नाय भावांनो! ह्यो किरण माने सातारी मातीतला हाय.. उगं कुना लुंग्यासुंग्याची उगाच तळी उचलून धरनाऱ्यातला नाय! समोर मानूसच डोंगराएवढा हाय.. त्याची का स्तुती करनार नाय सांगा? त्यो मानूस समाजासाठी काय-काय करतो हे जर सांगितलं, तर त्याची निंदा करनार्‍याचंबी डोळं पांढरं व्हत्याल,' असं त्यांनी या पोस्टच्या सुरुवातीला लिहिलं आहे. सगळा पिच्चर नाय सांगत, फक्त 'ट्रेलर' सांगतो असं म्हणत त्यांना शाहरुखच्या सामाजिक कार्याचा पाढाच वाचला.

किरण माने यांची पोस्ट-

- ॲसिड अटॅक झालेल्या महिलांवर उपचार करनं, त्यांच्या विद्रुप झालेल्या चेहर्‍यावर स्वखर्चानं प्लॅस्टिक सर्जरीसारखी महागडी ऑपरेशन्स करनं. त्यांच्यावर मानसिक उपचार करुन त्यांच्या मनाला उभारी देनं आणि त्यांना स्वत:च्या पायांवर उभं रहान्यासाठी सगळी आर्थिक मदत करनं, ही सगळी कामं तो गेली कित्येक वर्ष करतोय. खायचं काम नाय भावांनो..

- आपल्या आईवडिलांच्या आठवनीसाठी नानावटी हॉस्पीटलात त्यानं लहान मुलांच्या कॅन्सरवरच्या उपचारांसाठी एक वॉर्ड उभा केलाय, ज्यासाठी तो सतत लै मोठ्ठी आर्थिक मदत करत असतो.

- २०१२ साली त्यानं देशभरातली १२ खेडेगांवं दत्तक घेतली. तिथं स्वखर्चानं वीज-पाणी-शाळा आणि औषधं अशा सुविधा उपलब्ध करून देन्याचं काम त्यानं केलं. अजूनबी तिथं नवनविन सोयीसुविधा उपलब्ध करून देन्याचं काम तो आजतागायत करतोय.

- २००८ साली बिहार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यानं जगभर लाईव्ह कॉन्सर्टस् करून ३० दशलक्ष रूपये जमा करुन दिले. २०१५ मध्ये चेन्नई पूरग्रस्तांसाठी १ कोटी रूपये, २०१३ मध्ये उत्तराखंड पूरग्रस्तांसाठी ३३ लाख रूपये, तर डॉ. मनमोहन सिंग यांच्या 'त्सुनामी रिलिफ फंड'साठी २५ लाख रूपये त्यानं स्वत:च्या खिशातून दिले.

- एक पत्रकार त्याची मुलाखत घेऊन परत जात असताना, त्या पत्रकाराचा ॲक्सीडेंट झाला. तो गंभीर जखमी झाला. मृत्यूशी झुंज सुरू झाली. अशावेळी त्या पत्रकाराचा बरा होईपर्यन्तचा सगळा हॉस्पीटल खर्च त्यानं उचलला, जो दर दिवशी २ लाख रूपये होता.

- भारतभरातल्या झोपडपट्ट्यांमधल्या लहान मुलांच्या छोट्या-मोठ्या इच्छा-स्वप्न पूर्ण करणार्‍या 'मेक अ विश फाऊंडेशन' या समाजसेवी संस्थेबरोबर तो काम करतो.

- २००९ मध्ये ओरीसामधल्या ७ खेडेगांवांमध्ये त्यानं स्वखर्चानं सोलर इलेक्ट्रिसीटी प्रोजेक्ट सुरू केले. ज्यामुळे स्वातंत्र्यानंतर तब्बल ६१ वर्षांनंतर त्या गांवांमध्ये 'लाईटस्' आले.

- IPL सिझन 7 मध्ये त्याची टीम विजेता ठरली. बक्षिस म्हनून १५ कोटी रूपये मिळाले. ती सगळीच्या सगळी रक्कम त्यानं मुंबई आणि कलकत्त्यामधील गरीब कॅन्सर पेशंट्सवरील उपचारांसाठी दान करून टाकली.

- महाराष्ट्रातल्या आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांसाठी त्यानं जगभर कॉन्सर्ट करुन कोट्यवधी रूपये उभे केले तर इंडीयन आर्मीमधील जवानांसाठी ७ कोटी रूपये दिले.

- कोरोनाकाळात त्यानं स्वत:चं चार मजली ऑफीस बीएमसी ला दिलं. लॉकडाऊनमध्ये मुंबईत १००० गरीब कुटुंबांना तेल, पीठ, तांदूळ, डाळ इत्यादी सामान पुरवलं. अगदी हातावर पोट असलेल्या २००० लोकांना रोज ताजं अन्न दिलं. बंगालमधल्या अतिशय दुर्गम खेड्यापाड्यांमध्ये जाऊन राशन आणि सॅनिटायझर पुरवलं.

'अशी लै लै लै लै लै कामं हायेत गड्याहो... मला अशा कमीतकमी दहा पोस्टस् कराव्या लागत्याल यवढी. लक्षात ठेवा, ह्यो किरन माने कुठल्याबी मानसाला नीट पारखतो. 'काम' बघून 'सलाम' करतो. या त्याच्या कामांची जगभर दखल घेतली गेलेली हाय बरं का. त्यानं केलेल्या समाजोपयोगी कार्यासाठी त्याला जर्मनीमध्ये झालेल्या २० व्या UNESCO ॲवॉर्डस्मध्ये स्पेशल ॲवॉर्ड देऊन सन्मानित करन्यात आलंय. साऊथ कोरीयानं त्याला 'गुडविल ॲम्बॅसीडर' म्हणून सन्मानित केलंय. इंग्लंडमधल्या सर्वात मोठ्या 'लॉ युनिव्हर्सिटी'तर्फे त्याला ह्यूमन राईटस् आणि ॲक्सेस टू जस्टिस ॲन्ड क्राईम मधील कार्यासाठी स्पेशल डॉक्टरेट देन्यात आलीय. तो फक्त अभिनयातला 'बादशाह' नाय, तर 'मानूस' म्हनून बी 'किंग' हाय! सलाम शाहरूख खान... कडकडीत सलाम! कुठल्याबी सच्च्या भारतीयाला तुझा अभिमानच वाटंल. तुला वाढदिवसाच्या मनाच्या तळापास्नं शुभेच्छा भावा,' असं लिहित त्यांनी या पोस्टचा समारोप केला.

ड्रग्ज प्रकरणात शाहरुखचा मुलगा आर्यन खान तुरुंगात असतानाही किरण माने यांनी त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली होती. या संपूर्ण घडामोडी घडत असताना शाहरुख किती शांत आणि संयमी होता, याचं त्यांनी कौतुक केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT