Kiran Mane Facebook
मनोरंजन

"काही दमच नाही रे आरोपांमध्ये"; सहकलाकारांच्या तक्रारीवर किरण मानेंची नवी पोस्ट

'एक प्लॅन सक्सेसफुल होईना झालाय. आधी म्हणाले व्यावसायिक कारणामुळे काढलंय. नंतर म्हणाले महिलांशी गैरवर्तन'

स्वाती वेमूल

सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेतल्याने अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना स्टार प्रवाहवरील (Star Pravah) 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) या मालिकेतून काढून टाकल्याचं बोललं जात असतानाच मालिकेचे दिग्दर्शक, काही कलाकार आणि वाहिनीने हा दावा खोडून काढत किरण माने यांना त्यांच्या गैरवर्तणुकीमुळेच मालिकेतून काढल्याचं सांगितलं. या प्रकरणाचा उगीच राजकीय रंग देण्यात आला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र सेटवर मी कोणतीही गैरवर्तणूक केली नाही, असं मानेंनी स्पष्ट केलं आहे. मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसविरोधात कोर्टात लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याविषयी त्यांनी फेसबुकवरही पोस्ट लिहिली आहे. घडलेल्या घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी वाहिनी आणि कलाकारांच्या आरोपांवर उपरोधिक उत्तर दिलं आहे.

किरण मानेंचं स्पष्टीकरण-

"मी सेटवर गैरव्यवहार केला नाही. जर मी गैरवर्तणूक करत होतो, तर कलाकार का गप्प होते? ही वेगळीच स्क्रीप्ट लिहिली जात आहे. अशा गोष्टींना मी घाबरत नाही. माझ्या राजकीय पोस्टमुळेच मला मालिकेतून काढण्यात आलं आहे. मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसविरोधात मी कोर्टात लढणार. माझ्या नावाची बदनामी सुरू आहे. शर्वणी पिल्लई आणि सविता मालपेकर या माझ्या बहिणी आणि आईसारख्या आहेत. एवढे दिवस त्यांनी माझा त्रास का सहन केला? मी कोणत्याही महिलेशी गैरवर्तन केलं नाही. याविरोधात मी शेवटपर्यंत लढा देणार, मला मालिकेत परत नाही घेतलं तरी चालेल", अशी प्रतिक्रिया मानेंनी दिली.

कलाकारांचे आरोप-

याबाबत दिग्दर्शक सचिन देव म्हणाले, की अभिनेते किरण माने यांची सेटवरील वागणूक बरोबर नव्हती. त्यांना प्रॉडक्शन हाऊसकडून तीन वेळा समज देण्यात आली होती. तरीही त्यांनी आपली वागणूक सुधारली नाही. त्यामुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आलं. कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली किंवा राजकीय मत समाजमाध्यमांवर मांडले म्हणून काढण्यात आलेलं नाही. अभिनेत्री शर्वाणी पिल्ले म्हणाल्या, की किरण माने यांची बोलण्याची आणि वागण्याची पद्धत बरोबर नव्हती. आपल्यामुळेच ही मालिका चालते, असा टेंभा वारंवार ते मिरवत होते. त्यांच्या अशा गैरवर्तणुकीमुळेच त्यांना काढण्यात आले आहे. परंतु त्यांनी या गोष्टीला राजकीय रंग दिला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही शर्वाणी पिल्ले आणि सचिन देव यांच्या प्रतिक्रियेला दुजोरा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT