Mumbai bmc seals Bandra gym that allowed Sahid Kapoor 
मनोरंजन

फक्त शाहिद कपूरसाठी जिम उघडली अन्....

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : करोना व्हायरसमुळे संपूर्ण जग घाबरलेले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व जिम बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. वांद्रे येथील ‘अँटी ग्रॅव्हिटी क्लब’ या जिमला मुंबई महानगरपालिकेने सील केले. पण सरकारी आदेशाला धुडकावून वांद्र्यातील ही जिम फक्त अभिनेता शाहिद कपूर व त्याची पत्नी मीरा राजपूतसाठी सुरु ठेवण्यात आली. या जिममध्ये शाहिद व मीरा यांना एक्सरसाईज करताना फोटोग्राफरने पाहिलं. 

शाहिद कपूर व जिमचे मालक युधिष्ठिर जयसिंग यांच्या या बेजबाबदार वागणुकीबद्दल महापालिकेने त्यांना फटकारलं. शाहिद व जिमच्या मालकाने एका व्यक्तीसाठी इतरांचे जीव धोक्यात आणले, म्हणून पालिकेने नोटीस पाठवली आहे. 'आदेशांचे पालन न झाल्यास जिम मालकावर कारवाई होऊन त्यांचे लायसन्ससुद्धा रद्द करण्यात येतील'. असं पालिका सहआयुक्त विनायक विसपुते यांनी सांगितलं.

या जिममध्ये फोटोग्राफरला पाहताच शाहिद व मीराने जिमच्या दुसऱ्या दरवाजातून काढता पाय घेतला आणि जिम मालकाच्या म्हणण्यानुसार जिमला सील केल्याची माहिती त्यांना नव्हती. मालकाने असेही सांगितले की, शाहिद त्यांचा फार जवळचा मित्र आहे. तो वर्कआउट करण्यासाठी आला नव्हता. शाहिदने काही जिमचं सामान मागवलं होतं आणि मी त्यांना ते व्यायामाचं सामान कसं वापरायचं त्याची पद्धत सांगत होतो. असं उडवाउडवीचं उत्तर जयसिंग यांनी दिलं.

आमच्या कंपनीने कोणतेही नियम तोडले नसल्याचं युधिष्ठिर यांनी स्पष्ट केलं. तरीही, या विषयावर शाहिदची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT