actress kangana ranaut  Team esakal
मनोरंजन

कंगनाला दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार

याचिकेवर पुढील सुनावणी लवकर घ्यावी अशी मागणी सिद्दीकी यांनी केली.

- सुनीता महामुणकर

मुंबई : पारपत्र नुतनीकरणासाठी (पासपोर्ट रिन्युअल) मुंबई उच्च न्यायालयात (mumbai high court) याचिका करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतला (actress kangana ranaut) आज मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने दिलासा देण्यास नकार दिला. जर अर्ज सुनावणीची घाई होती तर यापूर्वीच याचिका का नाही केली, असा सवाल खंडपीठानं केला. धाकड (dhakad) या सिनेमाच्या दुसऱ्या सत्राचे चित्रिकरण हंगेरीमध्ये (hungery) सुरू होत आहे. या सिनेमात काम करण्यासाठी जून ते ऑगस्टपर्यंत कंगनाला हंगेरीमध्ये जायचे आहे. मात्र तिच्या पारपत्राची मुदत सप्टेंबर 2021 पर्यंत आहे. (mumbai high court to hear kangana ranaut plea seeking passport renewal on june)

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी(international travel) प्रवाशांना परत येण्यापासून सहा महिने पारपत्र (passport validity) वैध असावे लागते. त्यामुळे तिने आता न्यायालयात याचिका केली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह ट्विट केल्यामुळे तिच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. वांद्रे पोलिसांनी यामध्ये राष्ट्रद्रोहाचा आरोपही ठेवला आहे. या पाश्वभूमीवर पारपत्र प्राधिकरणकडून नूतनीकरण केले जात नाही, असा दावा तिने केला आहे. आज तातडीने याचिकेवर न्या प्रशांत वराळे आणि न्या एस पी तावडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मात्र याचिकेत पारपत्र कार्यालयाला प्रतिवादी का केले नाही, असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला. तसेच पारपत्र अधिकार्यांनी आक्षेप नोंदविला आहे का, याचेही पत्र याचिकेत नाही, असे खंडपीठ म्हणाले.

यावर पारपत्र प्राधिकरण अधिकार्यांनी तोंडी आक्षेप घेतला असे कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी सांगितले. यावर, जर लेखी आक्षेप नसेल आणि पारपत्र विभाग प्रतिवादी नसेल तर आदेश कोणाला देणार, असे खंडपीठाने फटकारले. तसेच याचिकेत दुरुस्ती करण्याची मुभा खंडपीठाने दिली. याचिकेवर पुढील सुनावणी लवकर घ्यावी अशी मागणी सिद्दीकी यांनी केली. चित्रिकरण रखडले आहे आणि अन्य सर्व कलाकार, कर्मचारी वर्ग तिथे पोहचले आहेत असे त्यांनी सांगितले. यावर चित्रिकरणाच्या तारखा पुढे मिळतील. जर एवढी घाई होती तर याचिका यापूर्वी करायला हवी होती, त्यामुळे चित्रिकरणाच कारण देऊ नका, असे खंडपीठाने सुनावले. पुढील सुनावणी ता 25 रोजी निश्चित केली आहे.

अर्जात बहिण रंगोली चंडेल यांचे नाव का जोडले आहे, त्यांनापण व्यावसायिक कामासाठी जायचे आहे का, त्यांचा या अर्जाशी काय संबंध, असा प्रश्न खंडपीठाने केला. याबाबतही याचिकेत दुरुस्ती करण्याची मुभा खंडपीठाने दिली. कंगनाने केलेल्या काही ट्विटमुळे धार्मिक तेढ निर्माण होत आहे असा आरोप फौजदारी फिर्यादीमध्ये केला आहे. या तक्रारींविरोधात तिने न्यायालयात याचिकाही केल्या आहेत. कंगनाविरोधात भादंवि कलम 153(अ) अंतर्गत वर्णद्वेषी शेरेबाजी करून समाजात जातीय तेढ निर्माण करणं, 295(अ) अंतर्गत लोकांच्या धार्मिक भावना दुखावणं आणि 124 (अ) अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT