Mumbai Police uses Ayushmann Khurrana's Dream Girl 2: आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल 2 या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा टिझर आणि ट्रेलर नुकताच रिलिज झाला आहे. या ट्रेलरनं सोशल मिडीयावर अक्षरशः धुमाकुळ घातला. सोशल मिडियावर तो व्हायरल झाला आहे.
ड्रीम गर्ल 2 मध्ये यावेळी वेगळ्या विषयावर प्रेक्षकांना संदेश देण्यात येत आहे. मात्र या ड्रीम गर्ल चित्रपटाच्या माध्यमातुन मुंबई पोलीसांनी देखील सर्व नागरिकांना हटके शैलीत संदेश दिला आहे.
मुंबई पोलीस हे नेहमीच ट्रेंडिंग विषयांवर काही ना काही संदेश देणारे खास पोस्ट सोशल मीडिया शेयर करत असतात. यावेळी ड्रीम गर्ल 2 च्या माध्यामातुन मुंबई पोलिसांनी अभिनव पद्धतीने रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी याबाबत त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ड्रीम गर्ल 2 चित्रपटातील 'दिल का टेलिफोन' गाणे वापरले आहे. यामध्ये एक व्यक्ती दुचाकी चालवतांना आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करतांना दिसतोय.
तो फोनवर बोलत गाडी चालवतांना दिसतोय. त्यात त्याला रस्त्याच्या पलीकडे पोलिस दिसल्याने तो अचानक वळण घेतो आणि त्याचा अपघात होता होता वाचतो.
हा व्हिडिओ शेयर करतांना त्यांनी कॅप्शन लिहिले आहे की, ड्रीम गर्ल चा कॉल? याला सर्वांसाठी भयानक स्वप्न बनवू नका . 'आज वो अपनी लाइफ का सबसे बडा परफॉर्मन्स देना जा रहा है.' मात्र त्याचे परिणाम खूप जास्त धोकादायक असू शकतात!
आयुष्मानच्या ड्रीम गर्लचा फिवर सर्वांनाच झाला आहे. गेल्या आठवड्यातही बिहारच्या समस्तीपूर पोलिस युनिटने आयुष्मान खुरानाचे चित्रपटातील तो साकारत असलेल्या पूजाच्या भुमिकेचे कौतुक केले होते. त्याच्या मदतीने सायबर फसवणूकीचा प्रसार करण्यात मदत केली.
आयुष्मान खुराना हा नेहमीच त्याच्या चित्रपटात वेगवेगळ्या भुमिकेतुन तो समाजाच्या समस्या समोर आणतो.
ड्रीम गर्ल 2 हा सुपरहिट चित्रपट ड्रीम गर्लचा सिक्वेल आहे. त्याचा पहिला ड्रीम गर्ल हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता.
राज शांडिल्य दिग्दर्शित आणि लिखित, ड्रीम गर्ल 2, आयुष्मान खुराना, अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, अन्नू कपूर, विजय राज, अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. आयुष्यमानचा ड्रीम गर्ल 25 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये होणार रिलिज होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.