Mumtaz And Sharmila Tagore Fight, Mumtaz Revealed the reason.. Google
मनोरंजन

'आम्ही दोघी...', शर्मिला टागोरांशी बिघडलेल्या नात्यावर मुमताजचा खुलासा

अभिनेत्री मुमताज यांनी एका मुलाखतीत शर्मिला टागोर यांच्याविषयी मोठं वक्तव्य केलं होतं.

प्रणाली मोरे

सिनेइंडस्ट्रीत फक्त सिनेमे बनत नाहीत,तर इथे कलाकारांमध्ये घट्ट मैत्री आणि कट्टर दुश्मनी देखील पहायला मिळते. कॅमेऱ्याच्या मागे बऱ्याच गोष्टी घडत असतात. कोणाचं अफेअर होतं, कोणाचं ब्रेकअप होतं,कोणाला सुख-दुःख शेअर करणारा घट्ट मित्र मिळतो,तर कोणामधील शत्रूत्व त्यांना बरबाद करुन सोडतं. बॉलीवूड मधील असे अनेक किस्से आहेत. ७०-८० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्री मुमताज(Mumtaz) व दुसऱ्या शर्मिला टागोर(Sahrmila Tagore) यांच्याशी संबंधित एक किस्सा आहे. दोघींमधल्या दुश्मनीचे किस्से आजही चर्चेत आहेत. पण याचं कारण काय होतं? चला जाणून घेऊया सविस्तर.(Mumtaz And Sharmila Tagore Fight, Mumtaz Revealed the reason..)

मुमताज यांचा जन्म अब्दुल सलीम असकारी यांच्या घरात झाला ,जे ड्रायफ्रुट्सचे व्यावसायिक होते. मुमताज यांची आई ही ईराणची होती. मुमताज यांच्या जन्माच्या एक वर्षानंतर त्यांचे आई-वडील विभक्त झाले. त्यांची एक बहिण होती,जिचं नाव मल्लिका होतं. त्यांनी रेसलर आणि भारतीय अभिनेता रंधावासोबत लग्न केलं होतं. जे दारासिंग यांचे धाकटे बंधू होते.

मुमताज यांनी १९५८ साली पहिला सिनेमा केला होता,ज्याचं नाव होतं 'सोने की चिडियां'. त्यात त्या बालकलाकार म्हणून दिसल्या होत्या. त्यानंतर ६० च्या दशकात त्यांनी सिनेमात टीनएजरच्या रुपात काम करायला सुरुवात केली. त्यानंतर कितीतरी सिनेमात त्यांनी सहअभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या. त्यांनी दारासिंग सोबत जवळपास १५ ते १६ सिनेमांमध्ये काम केलं. ज्यामुळे त्या साहसी सीन करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जाऊ लागल्या. पण इथेच त्यांचे करिअर मागे पडायला सुरुवात झाली,पण त्यांनी मेहनतीनं पुन्हा आपल्या करिअरची नौका मार्गी लावली आणि आपली इमेज बदलली.

त्यांनी राजेश खन्नासोबत ब्लॉकबस्टर सिनेमे केले. फिरोज खान सोबत काम केलं. शम्मी कपूर आणि शशी कपूर देखील त्यांच्यासोबत काम करायला तयार झाले. मात्र पहिल्यांदा हे कलाकार मुमताज सोबत काम करायला पटकन तयार होत नव्हते हे देखील खरं आहे. धर्मेंद्रपासून जितेंद्रपर्यंत असे कितीतरी अभिनेते आहेत ज्यांनी मुमताज सोबत काम करण्यास नकार दिला होता. पण मुमताज यांचं टॅलेंट जसं समोर आलं तसं सगळ्यांचाच त्यांच्याकडे पहायचा दृष्टीकोन बदलला.

त्यावेळी मुमताज यांचे नाव टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जायचं. रेखा, हेमामालिनी, शर्मिला टागोर,जया बच्चन अशा कितीतरी अभिनेत्री इंडस्ट्रीवर राज्य करत होत्या. पण बोललं जातं की यामध्ये मुमताज आणि शर्मिला टागोर यांच्यात काहीच चांगलं नव्हतं. यावर मुमताज यांनी एकदा म्हटलं होतं की, ''ती स्पर्धा नव्हती. शर्मिला तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली. तिचा पहिला सिनेमा 'काश्मिर की कली' शम्मी कपूर सोबतचा,त्यामुळे ती लवकर स्टार झाली''.

''मी 'ब्रह्मचारी' सारख्या सिनेमातून शम्मी कपूरसोबत काम करायला सुरुवात केली पण सहअभिनेत्री म्हणून. शर्मिला आणि मी, दोघांनी राजेश खन्नासोबत खूप सिनेमे केले. म्हणून कदाचित मीडियानं आमच्याविषयी उलट-सुलट लिहिलं,पण हे खरं आहे की दोन अभिनेत्री कधीच मैत्रिणी बनू शकत नाहीत. आम्ही दोघीच नाही तर हे सर्वांच्याच बाबतीत लागू होतं. तेव्हाही आणि आता देखील. आम्ही एकत्र डिनर करत नाही आणि एकत्र हॅंगआऊटही करत नाही. नेहमी हेच होत आलं आहे''.

मुमताजचे नाव खूप अभिनेत्यांसोबत जोडले गेले. याविषयी जेव्हा त्यांना विचारलं गेलं होतं की, अभिनेत्यांच्या पत्नी तुमच्या सौंदर्यावर जळतात का? त्यावर मुमताज म्हणाल्या होत्या, मला हे माहित नाही की माझ्यामुळे अभिनेत्यांच्या पत्नींमध्ये असुरक्षिततेची भावना होती की नाही. पण एक सुंदर बाई,दुसऱ्या सुंदर बाईला पाहून नक्कीच जळते. पण माझ्यासोबत सगळे चांगले होते. त्यामुळे कोण माझ्या मागे माझ्याविषयी काय बोलतं हे जाणून घेण्याचा मी कधीच प्रयत्न केला नाही.

मुमताज यांनी नुकताच त्यांचा ७५ वा वाढदिवस सेलिब्रेट केला. त्यानिमित्तानं त्यांनी चाहत्यांशी लाइव्ह चॅटद्वारे संवादही साधला. त्याच चॅटमध्ये शम्मी कपूर यांच्यासोबतच्या अफेअर आणि लग्नासंबंधीच्या विषयावरही मोकळा संवाद साधला. मुमताज यांनी व्यावसायिक मयुर माधवानी यांच्यासोबत लग्न केले आहे. त्यांना दोन मुली आहेत. मुमताज आता आपलं कौटुंबिक आयुष्य एन्जॉय करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT