बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री मुमताज(Mumtaz) यांनी ३१ जुलै रोजी आपला वाढदिवस सेलिब्रेट केला. या खास दिवशी त्यांची मुलगी तान्या माधवानीने चाहत्यांसोबत मुमताज यांचा लाइव्ह संवाद आयोजित केला होता. या संवादादरम्यान मुमताज खूपच छान दिसत होत्या. त्यांना चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली. वृत्तानुसार,मुमताज या संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' सिनेमात दिसणार आहेत. एका चाहत्यांन त्यांना संजय लीला भन्साळींविषयी देखील विचारलं. त्याचवेळी एका चाहत्यानं मुमताज यांना शम्मी कपूर यांच्याशी लग्न का केलं नाही याविषयी देखील विचारलं. त्यावेळी मुमताज यांनी आपल्या चाहत्याला नाराज न करता उत्तर दिलं.(Mumtaz talks about not marrying Shammi Kapoor during live chat)
मुमताजच्या चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनी अभिनेत्रीच्या आरोग्याविषयी देखील चौकशी केली. मुमताज म्हणाल्या, ''त्यांची तब्येत आता खूप बरी आहे,त्यात सुधारणा होत आहे''.पुढे एका चाहत्यानं भन्साळीच्या हिरामंडी मध्ये काम करताय का याविषयी देखील विचारलं. तेव्हा मुमताज म्हणाल्या,''याचं उत्तर तुम्हाला भन्साळीच देतील'', असं अभिनेत्री यावेळी म्हणाली. जेव्हा चाहत्यांनी मुमताज यांना त्यांचा आवडता सहकलाकार विचारला. तेव्हा त्या म्हणाल्या,''त्यावेळचे त्यांचे सगळेच हिरो त्यांना पसंत करायचे. तो काळच वेगळा होता''.
चाहत्यांनी विचारलं की पुन्हा त्या सिनेमात दिसतील का? यावर मुमताज म्हणाल्या,''हा प्रश्न निर्माते,दिग्दर्शकांना विचारायला हवा. जर तुमची इच्छा असेल मला सिनेमात पहायची तर दिग्दर्शक-निर्मात्यांना मला सिनेमात का घेत नाहीत असा सवाल करा''. आणि ऑफर आली तरी ती भूमिका मला आवडायला हवी अशी अट मात्र अभिनेत्रीनं चाहत्यांसमोर घातली आहे.
त्यांच्या मुलीच्या एका फॉलोअरने सवाल केला की, तुम्ही शम्मी कपूर यांच्याशी लग्न का नाही केलं? त्यावर मुमताज म्हणाल्या,''तुम्हा सर्वांना माहितच आहे लग्न का नाही केलं मी शम्मी कपूरशी,पुन्हा सगळा इतिहास सांगू का? शम्मी कपूर यांची अट होती की लग्नानंतर मी करिअर सोडावं, तेव्हा मी फक्त १७ वर्षांची होते. आणि मला आयुष्यात खूप गोष्टी करायच्या होत्या''. मुमताज यांना शम्मी कपूरचं एका शब्दात वर्णन करा असा प्रश्न केल्यावर त्या म्हणाल्या, 'हॅन्डसम'.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.