मुंबई - कोरोनानं गंभीर परिस्थिती निर्माण केलीय. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्येही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्याचा फटका अनेक सेलिब्रेटींना बसला आहे. काही सेलिब्रेटींना आपला जीव गमवावा लागला आहे. एकापाठोपाठ सेलिब्रेटींचे अशाप्रकारचे जाणे सर्वांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे. त्यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला आहे. यंदाच्या वर्षी चित्रपट, संगीत, साहित्य, सिनेमॅटोग्राफी क्षेत्रातील मान्यवरांना कोरोनानं ग्रासलं होतं. कोरोनाशी दोन हात करताना त्यांचा मृत्यु झाल्याचे दिसून आले.
काही दिवसांपूर्वी प्रसिध्द सतार वादक देबू चौधरी (pandit debu chaudhari) निधन झाले होते. त्यावेळी त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर काही दिवसांत त्यांचा मुलगा प्रतिकचेही कोरोनानं निधन झाले आहे. त्यामुळे या दोघांच्याही निधनाची बातमी संगीत विश्वात वेगानं व्हायरल झाली आहे. त्यानं अनेकांना धक्काही बसला आहे. कोरोनाचा वाढता कहर आता सर्वांसाठी डोकेदुखीचा आणि चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रेटींनी चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
आपल्या आगळ्या वेगळ्या सतार वादनानं संगीताच्या विश्वात ओळख निर्माण करणा-या प्रतीक चौधरी यांचही कोविडच्या कारणानं निधन झाले आहे. एक आठवड्यापूर्वी त्यांचे वडिल देवब्रत चौधरी (pandit debu chaudhari) यांचंही कोरोनानं निधन झालं होतं. संगीत इतिहासकार पावज झा यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिक चौधरी यांनी दिल्लीमध्ये गुरु तेग बहादुर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला.
झा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, प्रतिक चौधरी (prateek chaudhuri) हे प्रसिध्द संगीतकार देबू चौधरी यांचे पुत्र होते. ते एक प्रतिभाशाली कलावंत होते. आयसीयुमध्ये त्यांचा जीवनाशी चाललेला संघर्ष हा आता संपुष्टात आला आहे. ते आता त्यांच्या वड़िलांजवळ गेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.