Jhund Movie Review Google
मनोरंजन

Jhund Movie Review: प्रवाहाबाहेरील टीमची व्यवस्थेला 'कीक'

कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्रावर काही काळ मर्यादा आली होती. त्यामुळे अनेक मराठी - हिंदी चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते.

युगंधर ताजणे

Jhund Movie Review: कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्रावर काही काळ मर्यादा आली होती. त्यामुळे अनेक मराठी - हिंदी चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते. त्यात प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेचा (Nagaraj Manjule) झुंड हा देखील (Jhund Movie) होता. दोन वर्षांपूर्वी टीझर आला होता तेव्हापासून या चित्रपटानं चाहत्यांच्या मनात मोठं गारूड निर्माण केलं होतं. त्याचं (Bollywood News) संगीत, चक्रावून टाकणारं छायाचित्रण, रुढार्थानं कलाकार नसणाऱ्यांकडून उंचीचा अभिनय करुन घेण्याचं नागराजचं कसब यासाऱ्या गोष्टी नेटकऱ्यांना कमालीचा भावला होतं. दोन आठवड्यांपूर्वी झुंडचं गाणं व्हायरल झालं, मग ट्रेलर आला...आणि नागराजच्या झुंडचं वातावरण तयार व्हायला लागलं. झुंड फिव्हर तयार होतोय, आणि झालाही आहे....यासगळ्यात चर्चा होती चित्रपटात मुख्य भूमिकेत असणाऱ्या बिग बी अमिताभ यांची.

झुंडमधून नागराजनं बॉलीवूडमध्ये (Bollywood celebrity) पदार्पण केलं आहे. त्यात त्याच्या पहिल्या चित्रपटात साक्षात अमिताभ बच्चन यांनी काम करणं म्हणजे नागराजला मिळालेली मोठी पोचपावती आहे. चित्रपटामध्ये अमिताभ यांनी केलेलं काम जबरदस्त आहे. त्यांच्या तोंडी असलेले संवाद, अभिनय सारं काही प्रशंसनीय असेच आहे. झुंडचा विषय झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकाची कथा एवढाच नाही तर तो खेळ प्रतिकात्मक असून त्यानिमित्तानं नागराजनं पडद्यावर सध्याच्या भोवतालचं जे विदारक वास्तव मांडलय ते पाहून थक्क व्हायला होते. अजूनही प्रवाहाच्या बाहेर असलेल्या ठराविक वर्गाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी जी झुंज द्यावी लागते त्यावर मार्मिकपणे भाष्य करणारा चित्रपट म्हणून झुंडचे वर्णन करावे लागेल. नागराजचा हा चित्रपट त्याच्या इतर सिनेमांप्रमाणे थेट एका विषयावर भाष्य करणारा नसून त्याच्या जोडीला अन्य विषयांवर अप्रत्यक्षपणे कोरडे ओढतो. त्याकामी मदतीला येतो छायाचित्रकार सुधाकर रेड्डी यांचा बोलका कॅमेरा.

Jhund Movie Trailer -

रेड्डी यांनी मोठ्या खूबीनं झुंडचं छायाचित्रण केलं आहे. त्याला तोड नाही. त्यांचा कॅमेरा या चित्रपटाचा प्राण आहे. त्यानं अनेक गोष्टींवर बोट ठेवत प्रेक्षकांना अर्थात अप्रत्यक्षपणे व्यवस्थेला परखड काही प्रश्न विचारले आहेत. मग तो प्रश्न समाजव्यवस्थेचा, वर्चस्वाचा, शिक्षण, आरोग्याचा, सांस्कृतिक वर्चस्ववादाचा यापैकी एक आहे. झुंड आपल्यापुढे 21 व्या शतकातील वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दारिद्रय मांडतो. ते आपल्याला पटावं असा काही दिग्दर्शकाचा आग्रह मुळीच नाही पण त्याची मांडणीच एवढी प्रभावी आहे की, आपणही नकळत त्याच्या विचारविश्वाचा एक भाग होऊन जातो. आणि त्याची भाषा बोलू लागतो.

चित्रपटाची कथा सांगण्यापेक्षा त्यावर बोलणं, लिहिणं अधिक संयुक्तिक ठरेल. कारण नागराजच्या चित्रपटांमध्ये कथेपेक्षा बाकीच्या गोष्टी अधिक बोलतात, आपल्याला ठणकावून काही प्रश्न विचारतात. झुंडमध्ये त्यानं लावलेल्या फ्रेम्स, चिन्हं, प्रतिकं, रंग, वेशभूषा, संवाद, संगीत, हे सारं प्रभावीपणे आपल्यासमोर येतं. यातील प्रत्येक घटक तुम्हाला काही सांगू पाहतो. तुमच्याशी संवाद साधतो. रेल्वेलाईन, झोपडपट्टी, त्यातील दंगेखोर मुले, त्यांचा पेहराव, बोलीभाषा, व्यक्तिमत्वं, त्यांचे कुटूंब आणि त्यांचे भविष्य हे साऱ्यांना नागराजनं एका खेळानं जोडण्याचा प्रयत्न केला आहे. तो आपल्याला खिळवून ठेवणारा आहे. एवढं मात्र नक्की. यासगळ्यात संगीतकार अजय- अतुल यांच्या संगीतानं झुंडला वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. त्यांची गाणी आपलं केवळ मनोरंजन करत नाही तर त्यातून नवं काही सांगू पाहणारी आहेत.

* झुंडची कथा काय आहे....

'स्लम सॉकर' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण दिले होते. त्यांचा संघर्षमय प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. अमिताभ यांनी विजय यांची भूमिका केली आहे. प्राध्यापक विजय यांनी फुटबॉल असोशिएशनची स्थापना केली होती. त्यामाध्यमातून त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षित केले. व्यसनाच्या आहारी गेलेल्या त्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बारसे यांनी केलेले प्रयत्न झुंडमधून मांडण्यात आले आहे.

* एक गोष्ट लक्षात ठेवाल-

झुंड पाहायला जाताना नागराजच्या पूर्वीच्या चित्रपटांचा रेफरन्स डोक्यात न ठेवता त्याचं नवं म्हणणं काय आहे जाणून घेण्यासाठी झुंडच्या वाटेला जा, नाहीतर आपल्याला काही गोष्टींची पुनरावृत्ती वाटण्याची शक्यता आहे. केवळ स्पोटर्स मुव्ही म्हणून त्याकडे न पाहता त्या एका खेळाच्या माध्यमातून व्यवस्थेला नागराजनं विचारलेले थेट प्रश्न समजावून घेण्यासाठी झुंड पाहायला हवा. त्यात ज्या कलाकार मुलांनी काम केले आहेत त्यातील अनेकजण प्रोफेशनल आर्टिस्ट नाहीत तरीही त्यांनी कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याचं धाडस करुन ज्याप्रकारे स्वताला व्यक्त केलं आहे ते आपल्याला थक्क करणारं आहे. तेव्हा पूर्वीच्या चित्रपटात अमूक एखाद्या गोष्टी अशाच होत्या....म्हणून याही चित्रपटात एकुण तसाच प्रकार आहे असे समज करुन घेणं चूकीचे ठरेल. कारण झुंड आपण सध्याच्या परिस्थितीत जो विचार करतो किंबहूना तो विचारही आपल्या डोक्यात अनावधानानं येतो अशावर 'फोकस' आहे. हे आवर्जुन लक्षात ठेवावे.

* झुंड - **** स्टार

दिग्दर्शक - नागराज मंजुळे

कलाकारा - अमिताभ बच्चन, विकी कादियान, अंकुश, आकाश ठोसर, रिंकु राजगुरु

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT