nagraj manjule make webseries of matka king ratan khatri SAKAL
मनोरंजन

Nagraj Manjule: नागराज मंजुळे या 'मटका किंग'वर बनवणार वेबसिरीज, लवकरच शुटींग सुरु

नागराज मंजुळें खाशाबा जाधवनंतर मटका किंगवर सिनेमा बनवणार आहेत. वाचा सविस्तर

Devendra Jadhav

Nagraj Manjule New Movie: नागराज मंजुळे हे मराठी मनोरंजन विश्वातले आघाडीचे दिग्दर्शक. नागराज मंजुळे यांनी झुंडच्या माध्यमातुन हिंदी सिनेसृष्टीला सुद्धा स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलं.

नागराज लवकरच नाळ 2 च्या माध्यमातुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यानिमित्ताने लल्लनटापला दिलेल्या मुलाखतीत नागराज मंजुळे यांनी आगामी प्रोजेक्ट्सची माहिती सांगितली. नागराज आता लवकरच मटका किंगवर सिनेमा बनवणार आहेत. कोण आहे तो? वाचा सविस्तर

नागराज मंजुळे मटका किंगवर बनवणार सिनेमा

नागराज मंजुळे आता "मटका किंग" नावाच्या सट्टेबाजीवरील आगामी सिरीजसाठी निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत हातमिळवणी करणार आहेत.

1960 आणि 90 च्या दशकात घडणारी गोष्ट या वेबसिरीजच्या माध्यमातुन दाखवली जाणार आहे. ही वेबसिरीज भारतातील जुगाराचे संस्थापक आणि 'मटका किंग' म्हणून ओळखले जाणारे रतन खत्री यांच्या जीवनावर असणार आहे.

कोण होते रतन खत्री?

मटका किंग अशी रतन खत्रींची ओळख होती. त्यांनी मटका खेळण्यात अनेक नवनवीन पद्धती शोधून काढल्या. त्यांनी मटक्यातुन स्लिप काढण्याची पद्धत संपवली आणि पत्ते खेळून सट्टेबाजीचे आकडे काढायला सुरुवात केली.

रतन एक सिंधी होते. जे फाळणीनंतर सिंध, पाकिस्तानमधून मुंबईत आले होता. त्यावेळी ते अवघे १५ वर्षांचे होते. यादरम्यान रतन यांचा कल्याण भगतशी संपर्कात आला. कल्याणने १९६२ मध्ये वरळीत मटका सुरू केला. लवकरच रतन खत्री त्याचे व्यवस्थापक बनले आणि २ मे १९६४ रोजी रतन खत्रीने स्वतःचा मटका सुरू करुन सर्वांना मागे सोडले.

मटक्यासारख्या बेईमानीच्या खेळात रतन खत्री खूप प्रामाणिक असल्याचे आजही बोलले जाते.

नागराज मंजुळेंच्या नाळ 2 ची उत्सुकता

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'नाळ भाग २' दिवाळीत म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून नुकतेच या चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल चांगला प्रतिसाद मिळालाय. या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दिप्ती देवी, त्रिशा ठोसर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WTC Points Table: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाकडून हिसकावला 'नंबर वन'चा मुकूट; पर्थमधील विजयानंतर कसे आहे फायनलचे समीकरण?

Latest Maharashtra News Updates : शिवसेनेने बोलावलेल्या आमदारांना पुन्हा मतदारसंघात जाण्याच्या सूचना

"आम्हाला आई-बाबा म्हणून निवडलंस" लेकाच्या दहाव्या वाढदिवशी रितेश-जिनिलियाने दिल्या खास शुभेच्छा , "एक उत्तम मुलगा..."

CERC Recruitment 2024: भारत सरकारने जाहीर केली नवीन भरती, 29 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज

Pune: पोलिसांची कामगिरी वाचून व्हाल थक्क; स्मशानभूमीतील लाकडावरुन लावला खुनाचा तपास!

SCROLL FOR NEXT