namrata sambherao working with husband yogesh sambherao in movie ekda yeun tar bagha SAKAL
मनोरंजन

Namrata Sambherao: यंदाचा पाडवा नम्रतासाठी खास! नवऱ्यासोबत झळकणार आगामी सिनेमात

Devendra Jadhav

Namrata Sambherao News: यंदा दिवाळीचा सण हा मोठ्या उत्साहात सुरु आहे. आज पाडवा. नवरा - बायकोच्या नात्याचा पवित्र सण. अशातच यंदाचा पाडवा महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावसाठी खास आहे.

नम्रताचा नवरा योगेश संभेराव तिच्यासोबत आगामी सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे नम्रताच्या यंदाच्या पाडव्याचं डबल सेलिब्रेशन असणार आहे.

अभिनेत्री नम्रता संभेरावला तिच्या नवऱ्याने यंदा भारी गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे नम्रता सध्या चांगलीच खुश आहे. तुम्हाला ही उत्सुकता असेलच की, असं काय गिफ्ट आहे की ज्यामुळे नम्रताचा यंदाचा पाडवा विशेष ठरणार आहे. तर ८ डिसेंबरला नम्रताचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात योगेश संभेराव म्हणजेच नम्रताचा नवरा एका छोटेखानी भूमिकेत दिसणार आहे. आता रील लाईफमध्ये हे कपल एकत्र झळकणार असल्याने रिअल टू रील हा प्रवास नम्रताला विशेष आनंद देणारा आहे यात शंका नाही.

८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक कृष्ण चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी,डॉ.झारा खादर यांची आहे.

या सिनेमात लोकप्रिय कलाकारांची फौज आहे. त्यामुळे सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे. हा सिनेमा आधी २४ नोव्हेंबरला भेटीला येणार होता. पण आता मात्र सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आलीय.

लेखक अभिनेता प्रसाद खांडेकर 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. सयाजी शिंदे, भाऊ कदम,विशाखा सुभेदार,गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव,ओंकार भोजने राजेंद्र शिसातकर वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने,सुशील इनामदार आदि कलाकारांची भली मोठीफौज चित्रपटात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: आपण PM मोदींसोबत आहोत हेच विसरले बायडेन; फजितीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Duleep Trophy: अर्शदीपच्या ६ विकेट्स अन् श्रेयस अय्यरच्या संघाने चाखली विजयाची चव, पण फायदा होणार ऋतुराजच्या संघाला?

Pitru Paksha 2024 :  नदी, घर, झाडं आणखी बरंच काही…! कुठे कुठे करू शकतो पितृपक्षात पिंडदान?

Latest Maharashtra News Live Updates: आमचे एक तत्व आहे की, जर आपल्याला शांततेने जगायचे असेल, तर आपले शेजाऱ्यांशी चांगले संबंध असले पाहिजेत- राजनाथ सिंह म्हणतात

Electricity Saving Tips : वाढत्या वीज बिलांमुळे हैराण आहात? या भन्नाट ट्रिकने खर्च होईल निम्मा

SCROLL FOR NEXT