Why Nana Patekar- Amitabh Bachchan Not Work Together 
मनोरंजन

Amitabh Bachchan Nana Patekar Friendship : 'नानाची अन् माझी तुलना होऊच शकत नाही!' बिग बी असं का म्हणाले होते?

अमिताभ आणि नाना पाटेकर या दोन्ही सेलिब्रेटींनी कोहराम नावाच्या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते.

सकाळ डिजिटल टीम

Why Nana Patekar- Amitabh Bachchan Not Work Together : एकीकडे नाना पाटेकर आणि दुसरीकडे बिग बी अमिताभ बच्चन, या दोघांमध्ये सरस कोण यावर अनेकांमध्ये वाद होतील, पण कुणी काही का म्हणेना नाना पाटेकर यांनी स्वताच्या अभिनयानं वेगळी वाट निर्माण केली. दुसरीकडे अमिताभ हे साऱ्या बॉलीवूडचे शहेनशहा झाले. या दोन्ही अभिनेत्यांच्या अभिनयाची स्टाईल वेगळी, देहबोली निराळी, संवादफेक वेगळी...

अमिताभ आणि नाना पाटेकर या दोन्ही सेलिब्रेटींनी कोहराम नावाच्या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. मात्र त्या चित्रपटानंतर हे दोन्ही दिग्गज कलावंत एकत्र कधीही दिसले नाहीत. १९९९ मध्ये मेहूल कुमार यांनी तयार केलेल्या कोहराम या चित्रपटामध्ये नाना पाटेकर आणि अमिताभ यांची जोडी दिसली होती. त्यातील त्या दोन्ही कलावंतांच्या भूमिकेचे प्रचंड कौतूक झाले होते. अमिताभ सरस की नाना अशी चर्चा त्या चित्रपटामुळे बराच काळ सुरु होती.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

कोहराम नंतर अनेकांना अमिताभ आणि नाना पाटेकर एकत्र दिसणार अशी अपेक्षा होती. मात्र तसे काही झाले नाही. आता या दोन्ही सेलिब्रेटींना एकत्र काम केले याला २४ वर्षे होतील. येत्या काळात हे दोन्ही सेलिब्रेटी एकत्र येतील अशी शक्यताही कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मीडियातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोहरामच्या वेळेस अमिताभ आणि नाना पाटेकर यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे की काय त्यांनी पुन्हा कधी एकत्रित काम न करण्याचा निर्णय घेतला.

२०१५ मध्ये इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नानांनी सांगितले होते की, आम्ही चांगले मित्र जरुर आहोत मात्र आम्ही कोणत्या चित्रपटातून एकत्र येऊ किंवा नाही याविषयी खात्रीनं सांगता येणार नाही. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. ती गोष्ट निराळी होती. आता पुन्हा त्याच त्याच गोष्टींवर चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. येत्या काळात जर माझ्याकडे एखादी नवीन स्क्रिप्ट आली तर आम्ही एकत्र येऊ. असेही नानांनी यावेळी सांगितले.

असं म्हटलं जातं की, कोहराम चित्रपटाच्यावेळी एका फाईट सीनच्यावेळी झालेल्या वादाच्या दरम्यान तो प्रसंग घडला. त्यानंतर हे दोन्ही सेलिब्रेटी पुन्हा कधीच एकत्र दिसले नाही. त्यावेळच्या वेगवेगळ्या मासिकांमध्ये ते छापूनही आले होते. मला त्यांच्यापासून कोणताही त्रास नाही किंवा माझी कोणतीही समस्याही नाही. चांगली एखादी स्क्रिप्ट आली की आम्ही एकत्र काम करु असे नानांनी त्यावेळी सांगितले होते.

२०१६ मध्ये आलेल्या नटसम्राट नावाच्या मराठी चित्रपटामध्ये नाना पाटेकर यांनी जी भूमिका केली होती त्यामुळे त्यांच्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला होता.त्यावेळी या चित्रपटाचा हिंदी रिमेक होणार असल्याची चर्चा होती. त्यात बिग बी अमिताभ बच्चन काम करणार असल्याची चर्चा होती. मात्र अमिताभ यांनी आपल्याला नाना पाटेकर यांची भूमिका मिळणार असल्याचे कळताच त्यांनी नकार दिला. त्याला दुसरे कारण नाना पाटेकर यांनी त्या चित्रपटात केलेले काम हे देखील होते.

नाना आणि माझ्यात तुलना होऊ शकत नाही. ते खूपच प्रभावी कलाकार आहेत. त्यांनी नटसम्राटमध्ये जे काम केले त्यावरुन आपल्याला अंदाज येतो. मला ही भूमीका करता येणार नाही. मी त्यापेक्षा चांगली करु शकणार नाही. असे अमिताभ यांनी म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: मतदान प्रक्रियेत अडचणी, शिवडी-लालबाग मतदारसंघातील केंद्र क्रमांक ४१ येथील ईव्हीएम मशीन बंद

Satara Assembly Election 2024 : उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार

Maharashtra Assembly Elections 2024: मतदान करायला जाताय? मग नाश्त्यात बनवा दुधीचे थालीपीठ, दिवसभर राहाल उत्साही

Mumbai Election: मुंबईचा किंग कोण? या चुरशीच्या लढतींकडे राज्‍याचे लक्ष!

Accident: मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT