Nana Patekar Angry On Sanjay Leela Bhansali Bajirao Mastani : प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे सध्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून नानांनी जोरदारपणे बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे.
निमित्त आहे की, प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द व्हॅक्सिन वॉर या चित्रपटामध्ये नानांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. त्यात त्यांनी डॉ. बलराम भार्गव यांची भूमिका केली असून त्याबाबत वेगवेगळ्या गोष्टीही सांगितल्या आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नानांनी बॉलीवूड आणि बॉलीवूडमधील अभिनेते, त्यांच्या कलाकृती यावर त्यांच्या नेहमीच्या शैलीत निशाणा साधला आहे.
Also Read - सारखी चक्कर येते? मग नका करु दुर्लक्ष...'हे' असू शकतं कारण!
नानांनी सनीचा गदर आणि शाहरुखचा जवान पाहिला तेव्हा त्यांना तो पाहवला नाही.अशी प्रतिक्रिया दिली होती. सध्या जे काही तयार होते आहे त्यातून आपण प्रेक्षकांना कशाप्रकारचा आशय देतो आहोत हे समजत नाही. काही दिवसांपूर्वी सध्याचा चर्चेतील आणि गाजत असलेला चित्रपट आपण पाहिला पण तो काही आवडला नाही. असे नानांनी शाहरुखच्या जवानचा उल्लेख न करता सांगितले होते. त्यावरुन वेगळ्याच वादाला सुरुवात झाली आहे.
यानंतर सोशल मीडियावर नानांनी यापूर्वी देखील बॉलीवूडच्या सेलिब्रेटींवर जी टीका केली होती त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशातच प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना देखील नानांचा ओरडा खावा लागला होता. भन्साळी यांच्या ब्लॉकबस्टर बाजीराव मस्तानीच्या वेळेस नानांनी जेव्हा त्या चित्रपटातील मल्हारी गाणं ऐकलं तेव्हा त्यांना राग आला होता. ते अस्वस्थ झाले होते. त्यांनी भन्साळी यांना थेट फोन करुन त्याविषयी विचारणा केली होती.
नानांनी भन्साळी यांना त्या गाण्यामध्ये वाट लावली....असा जो शब्द आला आहे, त्याचा अर्थ काय, आणि तो कशासाठी अशी विचारणा केली होती. नानांचा तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रियाही भलत्याच भन्नाट आहे. नाना हे त्यांच्या आक्रमक, स्पष्ट आणि परखड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. कुणीतरी बोललं पाहिजे, आणि जे चूकीचे होत आहे, दिसत आहे त्यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे. अशी भूमिका नानांनी अनेकदा घेतल्याचे दिसून येते.
नानांनी भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी विषयी म्हटले होते की, मी जेव्हा त्यांच्या चित्रपटातील ते मल्हारी गाणे पाहिले तेव्हा खूपच निराश झालो होतो. मी त्याला थेट फोन केला आणि वाट लावली म्हणजे काय अशी विचारणा केली होती. मला जे आवडलं नाही ते मी त्याला सांगितले. जे बोलतो त्यावर लोकं काय म्हणतात त्याचे मी वाईट वाटून घेत नाही. जर आवडले नाही तर बोलणार.
द व्हॅक्सिन वॉरच्या निमित्तानं नाना चार ते पाच वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसत आहेत. हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले असून त्यात अभिनेत्री पल्लवी जोशी, गिरीजा ओक यांच्या भूमिका आहेत. नुकताच त्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यालाही नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.