nana patekar comment on why he is not cast in welcome 3 during the vaccine war trailer launch  SAKAL
मनोरंजन

Welcome 3 मध्ये तुम्ही का नाही? विचारताच नाना पाटेकर स्पष्टच म्हणाले,"त्यांना वाटतं आम्ही जुने कलाकार..."

वेलकम 3 मध्ये कास्ट केलं नाही? प्रश्न विचारताच नानांनी दिलं सडेतोड उत्तर

Devendra Jadhav

नाना पाटेकर हे भारतीय मनोरंजन विश्वातील हरहुन्नरी अभिनेते. नाना पाटेकर यांची प्रत्येक विषयावर स्पष्ट आणि रोखठोक मतं असतात.

नाना पाटेकर नुकतेच द व्हॅक्सीन वॉर सिनेमाच्या ट्रेलर लॉंच इव्हेंटमध्ये सहभागी होते. यावेळी आगामी Welcome 3 सिनेमात नाना पाटेकरांना कास्ट का करण्यात आलं नाही असा प्रश्न विचारताच नाना पाटेकर यांनी सडेतोड उत्तर दिलं.

(nana patekar comment on why he is not cast in welcome 3)

वेलकम 3 मध्ये का नाही? नाना पाटेकर म्हणाले...

वेलकम फ्रँचायझीच्या पुढचा चित्रपट 'वेलकम टू द जंगल' सिनेमाची काही घोषणा काही दिवसांपुर्वी करण्यात आली. खास व्हिडीओ व्हायरल झाला पण त्यात वेलकम गाजवणारे नाना पाटेकर आणि अनिल कपूर दिसले नाहीत.

मंगळवारी 'द व्हॅक्सिन वॉर'च्या ट्रेलर लाँचवेळी या वेलकम 3 संदर्भात प्रश्न विचारला असता नाना पाटेकर थोडे नाराज झाले. ते म्हणाला, "अशा चित्रपटात काम करणं जितकं अवघड आहे, त्यापेक्षा जास्त अवघड आहे तशा सिनेमात काम करणं."

वेलकम 3 मध्ये कास्ट न करण्याबाबत नाना पुढे म्हणाले, "त्यांना वाटतं की आम्ही जुने कलाकार झालो आहोत, कदाचित म्हणूनच ते आम्हाला घेत नाहीत. आता विवेक सारख्या लोकांना वाटतं की आम्ही जुने नाही झालो म्हणुन आम्हाला विचारतात. प्रत्येकाला काम मिळते, आता तुम्हाला करायचे आहे की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे."

द व्हॅक्सीन वॉरचा ट्रेलर...

कोविडवरील लसीकरणावर प्रसिद्ध दिग्दर्शक द काश्मिर फाईल्सचे निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी द व्हॅक्सिन वॉर यांनी चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. साधारण अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये कोविडच्या काळातील अनेक थरारक गोष्टींना, आठवणींना दिग्दर्शकानं उजाळा दिल्याचे दिसून आले आहे.

कोविडची व्हॅक्सिन तयार करण्याचे श्रेय भारतीय शास्त्रज्ञांना देण्यात येतं. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या लशी तयार करुन कोट्यवधी भारतीयांना जीवनदान दिले होते. यासगळ्या प्रकरणावर अग्निहोत्री यांनी द व्हॅक्सिन वॉरच्या निमित्तानं प्रकाश टाकला आहे. एकुणच त्यावेळची परिस्थिती, अर्थकारण, राजकारण यावरही त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले आहे.

द व्हॅक्सीन वॉर या तारखेला होणार रिलीज

विवेक अग्निहोत्री यांच्या या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर एका शास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय अभिनेत्री पल्लवी जोशी, गिरीजा ओक, रायमा सेन यांच्याही भूमिका यात आहेत.

हा चित्रपट याच महिन्यात २८ तारखेला प्रदर्शित होणार आहे. त्याच्या व्हायरल झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Polls: मविआ स्पष्ट बहुमताजवळ जाणार! ‘या’ एकमेव एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतोय?

Assembly Election Voting 2024: भाजपच्या महिला आमदाराने स्वतःला मतदान केंद्रात घेतले कोंडून, विरोधी पक्षाची दगडफेक

Ulhasnagar Assembly constituency Voting : उल्हासनगरात पैसे वाटल्यावरून पप्पू कलानी व कुमार आयलानी आमने-सामने, दोन्ही गटात तणाव

Exit Poll: एक्झिट पोल येताच देवेंद्र फडणवीस मोहन भागवतांच्या भेटीला; संघ मुख्यालयात खलबतं

Sports Bulletin 20th November : भारतीय क्रिकेटपटूंनी बजावला मतदानाचा हक्क ते लिओनेल मेस्सी १४ वर्षांनी पुन्हा भारतात येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT