Nana Patekar Happy Birthday Bollywood Actor Life Story : बॉलीवूडमध्ये आपल्या ४ दशकांहून अधिक काळच्या कारकीर्दीत प्रेक्षकांचे अमाप प्रेम आणि लोकप्रियता मिळवणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये नाना पाटेकर यांचे नाव घेतले जाते. नाना हे नेहमीच त्यांच्या परखड स्वभाव आणि वक्तव्यासाठी ओळखले गेलेले सेलिब्रेटी राहिले आहेत. आपल्याला एखादी गोष्ट नाही पटली तर ती तितक्याच स्पष्टपणे सांगण्याची हिंमत असणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये नानांचे नाव घ्यावे लागेल.
बॉलीवूडमध्ये मोठमोठ्या कलाकारांची काही कमी नाही. पण त्यात नाना हे नेहमीच वेगळे ठरतात. केवळ पडद्यावरच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही नानांनी समाजाच्या भल्यासाठी घेतलेली भूमिका खूप काही सांगून जाणारी आहे. त्याचे लोकांनी, चाहत्यांनी कौतुक केले आहे. नाम ही नानांची समाजातील पीडितांसाठी काम करणारी सामाजिक संस्था अनेकांसाठी मोठा आधार ठरली आहे.
नाट्य कलाकार ते हिंदी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेता हा नानांचा प्रवास जेवढा वाटतो तेवढा सोपा नाही. अनेकदा नाना मोठ्या पोटतिडकीनं एखादी गोष्ट सांगताना दिसतात. कोणत्या तरी एका विधायक गोष्टीमुळे कुणाला समजावताना दिसतात यामागे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. गेल्या काही दिवसांपासून नाना हे त्यांच्या राजकीय विधानांमुळे चर्चेत आल्याचे दिसून आले.
नानांनी आगामी निवडणूकांमध्ये कोण जिंकून येईल, कुणाला किती जागा मिळतील आणि कोण पंतप्रधान होणार याविषयी केलेलं भाष्य चर्चेचा विषय झाला होता. आज आपण नानांच्या बर्थ डे निमित्तानं त्यांच्या आय़ुष्यातील संघर्षाविषयी जाणून घेणार आहोत. असं म्हटलं जातं की, वयाच्या १३ व्या वर्षापासून नानांना मोठ्या कष्टाला सामोरं जावं लागलं. कुटूंबाला आर्थिक सहकार्य करण्यासाठी नानांना फार लहान वयातच काम करावं लागलं होतं.
१३ व्या वर्षी नाना रोज आठ किमी दूर असलेल्या शाळेत पायी जात होते. याशिवाय थिएटरबाहेर चित्रपटांचे पोस्टर डकविण्याचे काम त्यांना करावे लागले होते. पोस्टर्स पेंटही करावे लागले होते. नानांनी केवळ हिंदी, मराठीच नव्हे तर वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केले आहे. त्यांनी १९७८ मध्ये आलेल्या गमन नावाच्या चित्रपटापासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांच्या या चित्रपटाची फारशी कुणी दखल घेतली नव्हती.
नानांनी क्राईम, थ्रिलर, सस्पेन्स, कॉमेडी, रोमँटिक, निगेटिव्ह सारख्या वेगवेगळया टाईपमधील चित्रपटांमध्ये काम केले. आणि ते प्रेक्षकांना कमालीचे आवडलेही. १९८९ मध्ये नानांचा परिंदा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी त्यातील नानांच्या भूमिकेनं प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. त्या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियताही मिळाली होती. परिंदासाठी नानांना बेस्ट सपोर्टिंग रोलसाठीचं नॅशनल अॅवॉर्डही मिळालं होतं.
नानांच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, काही महिन्यांपूर्वी नानांचा द व्हॅक्सीन वॉर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. विवेक अग्निहोत्री यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. त्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. यानंतर नाना आले ओले नावाच्या मराठी चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.