आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी बॉलीवूड(Bollywood)मध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारे अभिनेते नाना पाटेकर(Nana Patekar) यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. २०१८ मध्ये 'Me Too' मोहिमे अंतर्गत अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्तानं लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले होते. त्यानंतर जवळ-जवळ तीन-चार वर्षांनी नाना पाटेकर मोठ्या पडद्यावर परत येत आहेत. ते सोशल थ्रीलर सिनेमा 'द कन्फेशन'(The Confession) मध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या सिनेमाचा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.
ट्वीटर वर ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी एक मोशन पोस्टर पोस्ट करीत नाना पाटेकर मोठ्या पडद्यावर लवकरच परत येतायत अशी घोषणा केली आहेत. त्यांनी जो मोशन पोस्टर शेअर केला आहे,ज्यात नाना पाटेकर यांचा दमदार आवाज ऐकायला मिळत आहे. नाना म्हणतायत,''सत्याचा चेहरा मी पाहिला,सत्याचा आवाज पण ऐकला, सत्य समोर आलं तरी मला ते मान्य नाही,यात मला मरण आलं तरी ते मान्य आहे मला. नाना पाटेकर यांचा ऑडिओ जिथे संपतो तिथे नाना पाटेकर यांना देखील आपण पाहू शकतो.
या सिनेमाचं दिग्दर्शन अनंत नारायण महादेवन यांनी केलेलं आहे. तर,नरेंद्र हीरावत, प्रवीण शहा,सगुन बाघ,अजय कपूर आणि सुभाष काळे या 'द कन्फमेशन' सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या सिनेमाच्या निमित्तानं नाना पाटेकर अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर परत येतायत. त्यामुळे त्यांच्या सिनेमाच्या मोशन पोस्टरला पाहून त्यांचे चाहते मात्र सुखावले आहेत.
नाना पाटेकर २०१८ मध्ये रजनीकांत यांच्या 'काला' सिनेमात दिसले होते. या सिनेमात त्यांनी खलनायकाची व्यक्तिरेखा साकारली होती. २०१९ मध्ये 'हाऊसफुल ४' चं शूटिंग करायला त्यांनी सुरुवात केली होती पण तनुश्री दत्तानं Mee Too प्रकरणात त्यांचं नाव घेऊन त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते,तेव्हा त्यांनी सिनेमा अर्ध्यातच सोडला होता. त्यानंतर आता तीन-चार वर्षांनी ते 'द कन्फेशन' सिनेमात दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.