National Film Awards
National Film Awards  Esakal
मनोरंजन

National Film Awards : दिल्लीत मराठी चित्रपटांचा डंका ‘एकदा काय झालं’ चित्रपटातील अभिनेत्यांचा सन्मान

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

नवी दिल्ली - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.‘नर्गीस दत्त राष्ट्रीय एकात्मता श्रेणी’तील पुरस्कार ‘दि काश्मीर फाइल्स’ या चित्रपटास तर सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या श्रेणीत ‘थ्री टू वन’ या मराठी सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या २०२१ मधील पुरस्कारांचे वितरण मंगळवारी करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘गोदावरी’, ‘थ्री टू वन’, ‘रेखा’ या मराठी चित्रपटांना विविध श्रेणींमध्ये गौरविण्यात आले.

हिंदी सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फिचर फिल्ममध्ये ३२ श्रेणींत पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आले तर ‘नॉन फिचर फिल्म’मध्ये विविध २४ श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.

‘सरदार उधम’ हा हिंदीमधील सर्वोत्कृष्ट स‍िनेमा ठरला. ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सरदार उधम’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर, सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन आणि सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी: री-रेकॉर्डिंग या श्रेणींत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार ‘पुष्पा’ या तेलुगू चित्रपटासाठी अल्लू अर्जुन यांना प्रदान करण्यात आला.

आलिया भट, क्रिती सेनॉनचा गौरव

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दोन अभिनेत्रींना प्रदान करण्यात आला. ‘गंगूबाई काठ‍ियावाडी’ या चित्रपटासाठी आल‍िया भट, तर ‘मिमी’ या चित्रपटासाठी क्रिती सेनॉन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट सहअभिनेत्याचा पुरस्कार ‘मिमी’ या हिंदी सिनेमासाठी पंकज त्रिपाठी यांना, तर सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार पल्लवी जोशी यांना ‘दि काश्मीर फाइल्स’ या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला. गोदावरी’ या चित्रपटासाठी निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी 700 MM ची जुनी जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया

Hathras Stampede: हाथरस दुर्घटना! 'तो' शेवटचा कॉल अन् बाबाचा मोबाईल झाला बंद; वाचा इनसाईड स्टोरी

Share Market Opening: शेअर बाजार पुन्हा नव्या उच्चांकावर; सेन्सेक्स-निफ्टी आणि बँक निफ्टी विक्रमी पातळीवर उघडले

Team India Breakfast : छोले भटुरे, चॉकलेट अन् बाजरीपासून बनवलेले पदार्थ, वर्ल्ड चॅंम्पियन टीम इंडियासाठी 'असा' आहे खास नाश्ता

Team India Arrival Live Updates : आले रे आले... अजिंक्यवीर आले! थोड्याच वेळात रोहित अँड टीम PM मोदींच्या निवासस्थानी होणार रवाना

SCROLL FOR NEXT