Oscars 2023: Deepika Padukone Instagram
मनोरंजन

Oscars 2023: नाटू नाटू गाण्याविषयी माहित नाहीय?.. दीपिकानं थोडक्यात मांडला RRR चा इतिहास अन् सभागृह गेलं दणाणून..

ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्यात दीपिका प्रेझेंटर म्हणून गेली आहे आणि तिथं तिनं नाटू नाटू गाण्याची ओळख करत दिलेलं स्पीच सध्या जोरदात व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

Oscars 2023: एसएस राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला ब्लॉकबस्टर सिनेमा RRR मधील नाटू नाटू गाण्याच्या परफॉर्मन्सला ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात स्टॅंडिंग ओवेशन मिळालं. गाणं पाहून सभागृहातील प्रत्येकजण दंग होऊन गेला आणि प्रत्येकानं उभं राहून टाळ्यांच्या गजरात गाण्याचं कौतूक केलं.

दीपिका पदूकोण प्रेझेंटर म्हणून स्टेजवर आली आणि तिच्या भाषणा दरम्यान जेव्हा तिनं RRR मधील नाटू नाटू गाण्याचा उल्लेख केला तेव्हा तर पूर्ण ऑडिटोरियममध्ये नुसत्ता कल्ला ऐकायला मिळाला.

कारण अर्थातच ज्या गाण्यानं गेले इतके दिवस नुसता दंगा करून सोडलाय त्या गाण्याचा लाइव्ह परफॉर्मन्स पहायला हॉलीवूडचं पब्लिकही तितकंच उत्सुक होतं.

दीपिका पदूकोण म्हणाली-''हे ते गाणं आहे ज्याचा डंका पूर्ण जगात वाजतोय. जर आपल्याला अजूनही नाटू नाटू गाणं माहित नसेल तर त्याला आता तुम्ही जाणून घेणार आहात''.

त्यानंतर स्टेजवर नाटू नाटू गाण्यावर हॉलीवूडच्या कलाकारांनी परफॉर्मन्स दिला. परफॉर्मन्स दरम्यान सभागृहात बेधूंद होत लोकही गाणं एन्जॉय करत होते..

जेव्हा परफॉर्मन्स संपला तेव्हा सभागृहात उपस्थित प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात गाण्याचं कौतूक केलं.

सध्या ऑस्कर सोहळ्यातील नाटू नाटू गाण्यावरील परफॉर्मन्सचा हा व्हिडीओ जोरदार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता चाहत्यांना वेध लागतेयत ते केव्हा नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळतोय याकडे.

आरआरआर चा डंका भारतातच नाही तर परदेशातही वाजला. राजामौली यांच्या या सिनेमानं भारतात तब्बल ७५० करोडची कमाई केली होती त जगभरात ११०० करोड कमावले होते.

या सिनेमात ज्यूनियर एनटीआर, रामचरण यांच्या मुख्य भूमिका होत्या. अजय देवगण, आलिया भट्ट यांनी सिनेमात कॅमियो साकारले होते. 'नाटू नाटू' गाण्याला संगीतकार एमएम कीरावानी यांनी संगीत दिलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT