nawazuddin siddiqui  Google
मनोरंजन

सेल्फीच्या नादात नवाजुद्दिन सिद्दिकीला चाहत्यांनी फरफटत नेलं

एका कार्यक्रमाच्या ठिकाणी पाहुणा म्हणून गेले असताना अभिनेत्याची केली दयनीय अवस्था

प्रणाली मोरे

सेलिब्रिटींसाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या फॅन्सची काही कमी नाही. आपल्या आवडत्या कलाकाराच्या प्रेमात बुडालेले चाहते खिशात दमडीही नसताना अलाहाबादहून फुकट प्रवास करीत,तहानभूक विसरून मुंबई गाठतात,तर कधी तो आजारी पडला तर महायज्ञ,मृत्युंजय जप करणारे चाहत्यांचीही कमी नाही. खिशातले होते-नव्हते तेवढे पैसे खर्च करून आपल्या आवडत्या कलाकाराचे फेव्हरेट गिफ्ट विकत घेऊन ते त्याच्यापर्यंत पाहोचावं म्हणून जीवाची तगमग करणारे चाहते तर ठार वेडे म्हणावे लागतील. आता मुंबईत अमिताभच्या जलसा,प्रतिक्षा बाहेर,शाहरुखच्या मन्नात बाहेर तर बांद्यातील सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर अशा वेड्या फॅन्सच्या रांगा हे याचे दाखले म्हणावेत. आता सेल्फी हे वेड प्रत्येकाला लागलं आहे,आणि हा सेल्फी जर आपल्याला एखाद्या सेलिब्रिटीसोबत किंवा आपल्याच आवडत्या कलाकारासोबत काढता आला तर मग काय लॉटरीच लागली. पण हा चाहत्यासोबत सेल्फी काढण्याचा अनुभव भारी पडलाय ब़ॉलीवूड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीला(nawazuddin siddiqui).

एका कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले असताना त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी अक्षरशः गराडा घातला. इतकी गर्दी की नत्याच्या सुरक्षारक्षकांनाही कळले नाही की नवाजुद्दिनला एका चाहत्यानं सेल्फीच्या नादात कसं फरफटत खेचत नेलं. कसंबसं सुरक्षारक्षकाने नवाजुद्दिनला त्या घोळक्यातून बाहेर काढून वाचवले खरे पण नवाजुद्दिनने याचा धसका घेतलेला व्हायरल व्हिडीओतनं पहायला मिळतोय .सेलिब्रिटी कॅमेरामन विरल भयानीनं पोस्ट केलेल्या त्या व्हिडीओतनं हा नवाजुद्दिनवर झालेला सेल्फी अटॅक पहायला मिळतोय. नवाजुद्दीनचा हा व्हिडिओ जुना आहे. हा व्हिडिओ २०१९ मधला कानपूर इथला आहे. लोक त्यांच्या फोनमध्ये नवाजची एक झलक टिपण्यासाठी तुटून पडले होते. त्यावेळीही या व्हिडिओची खूप चर्चा झाली होती.

सध्या नवाजुद्दीन कंगना रणौतसोबत तिच्या होम प्रॉडक्शन सिनेमात व्यग्र आहे. तो कंगनाच्या 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात नसीरुद्दीन शाहसोबत अवनीत कौर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT