Nawazuddin Siddhiqui  esakal
मनोरंजन

Nawazuddin Siddhiqui :'त्यांच्यासोबत जेवायला बसलो म्हणून बाहेर काढलं, काय चूक होती माझी?'

गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दीन हा त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आल्याचे दिसून येते आहे. त्यानं केलेल्या वक्तव्यामुळे तो अडचणीत सापडला होता.

युगंधर ताजणे

Nawazuddin Siddiqui Interview Sturggling Days : आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतील अभिनयानं केवळ भारतच नाहीतर जगभरामध्ये प्रसिद्ध झालेल्या नवाझुद्दीनचा बोलबाला अनेकांना माहिती आहे. सरफरोशपासून त्याची झालेली सुरुवात त्यानंतर त्यानं वेगवेगळ्या चित्रपटातून स्वताला सिद्ध करुन दाखवले आहे. यापूर्वी देखील नवाझुद्दीननं अनेक चित्रपटांतून आपण काय आहोत हे दाखवून दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दीन हा त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आल्याचे दिसून येते आहे. त्यानं केलेल्या वक्तव्यामुळे तो अडचणीत सापडला होता. नवाझुद्दीनची पत्नी आलिया आणि त्याच्या वैवाहिक नात्यात कटूता आली होती. त्यानंतर नवाझुद्दीनवर तिनं केलेले आरोप, त्याला नवाझुद्दीननं दिलेले उत्तर चाहत्यांसाठी धक्कादायक होते. प्रचंड गरिबीतून वर आलेल्या नवाझुद्दीनच्या बाबत असे होणे हे त्याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होते.

Also Read - Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

आता नवाझुद्दीनं एका मुलाखतीमध्ये लोकं जेव्हा आपल्याला नावं ठेवतात तेव्हा मात्र ते अनेक बाबत अनभिज्ञ असतात. अशी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, मला माझा संघर्ष माहिती आहे. अनेकांना त्यांचा गॉडफादर भेटतो त्याच्या जोरावर ते मोठी मजल मारतात. मला मात्र खूप संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळेच की काय आज प्रेक्षकांचे प्रेम मिळते आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सुरुवातीला जे मिळेल ते काम करण्यावर मी भर दिला होता.

स्पॉट बॉयपासून केलेली सुरुवात जेव्हा तुम्हाला सुपरहिट अभिनेता पर्यत पोहचवते तेव्हा तो प्रवास खूपच प्रेरणादायी वाटू लागतो. मला तर कित्येकदा जेवताना पुन्हा कामावर पिटाळण्यात आले होते. कॉलरला पकडून मला घेऊन जायचे. यासगळ्यात माझी काय चूक होती. इ टाईम्सनं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नवाझुद्दीननं त्याच्या प्रवासाविषयी अनेक खुलासे केले आहेत.

नुकताच नवाझुद्दीनचा जोगिरा सारा रा रा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याला म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नसला तरी त्यात नवाझुद्दीनच्या भूमिकेचे कौतूक होताना दिसते आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी त्यानं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आतापर्यत आपल्याला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले याविषयी सांगितले आहे. ज्युनिअर आर्टिस्ट आणि सिनिअर आर्टिस्ट यांची जागा वेगळी असे. त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्थाही वेगळी केलेली असे.

एकदा मी सिनिअर कलाकारांच्या तंबूमध्ये बसून जेवण करत होतो. त्यावेळी मला काही जणांनी कॉलरला पकडून बाहेर काढले होते. माझी चूक काय होती तर मी त्या कलाकारांसोबत जेवायला बसलो होतो. त्यामुळे त्यांनी मला बाहेर काढले होते. अशा शब्दांत नवाझुद्दीननं त्याची खंत व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SIP Investment: शेअर बाजार कोसळत आहे; एसआयपी बंद करावी की सुरु ठेवावी? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Latest Maharashtra News Updates live : 'बाटोगे तो कटोगे' घोषणेवर भाजप खासदार कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT