Nayanthara scene in Jawan cut from the films  esakal
मनोरंजन

Nayanthara Angry : 'आता पुन्हा कधीही बॉलीवूडमध्ये काम नाही'! नयनताराला काय झालं?

साऊथची सुपरस्टार नयनतारा ही आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

युगंधर ताजणे

Nayanthara scene in Jawan cut from the films : साऊथची सुपरस्टार नयनतारा ही आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिचा आणि शाहरुखचा जवान नावाचा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यातील तिच्या भूमिकेनं प्रेक्षकांचे, चाहत्यांची मोठी वाहवा मिळवली आहे. यासगळ्यात तिच्या एका आरोपानं चाहत्यांना धक्का बसला आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

यापुढील काळात नयनातारा त्या प्रकरणामुळे बॉलीवूडपटांमध्ये काम करणार नाही. अशा चर्चांना उधाण आले आहे. तिला जवानचा दिग्दर्शक अॅटलीचा राग आल्याचे बोलले जाते. जवानमध्ये नयनतारा ही मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. मात्र त्यावरुन तिला काही गोष्टी खटकल्याचेही समोर आले आहे.

Also Read - Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर

नयनतारा नेमक्या कोणत्या कारणामुळे नाराज आहे त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. हिंदूस्थाननं दिलेल्या एका बातमीनुसार, लेडी सुपरस्टार नयनताराचे म्हणणे आहे की, ती दिग्दर्शक अॅटलीवर नाराज आहे. त्याचे काऱण त्यानं तिच्या रोलमध्ये हस्तक्षेप करुन त्याला कात्री लावल्याचे तिचे म्हणणे आहे. तिच्यापेक्षा दीपिका पदुकोणचे कॅरेक्टर जास्त वेळ पडद्यावर दाखवल्याचा आरोप नयनतारानं दिग्दर्शक अॅटलीनं केला आहे. माझ्या भूमिका क़ॉर्नर केले गेले असे नयनतारानं म्हटले आहे. मात्र यासगळ्याबाबत नयनतारानं कोणत्याही प्रकारे अधिकृतरित्या प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे येत्या काळात ती यावर तिची भूमिका मांडणार असल्याचे बोलले जात आहे.

जवान हा ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी ७५ कोटींचा बिझनेस केला होता. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट असे आगळे वेगळे रेकॉर्ड जवानच्या नावावर नोंदले गेले. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही बॉलीवूडच्या चित्रपटानं केली नव्हती. जवाननं आतापर्यत सातशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

जवाननं दुसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दहा कोटींची कमाई केल्याचे दिसून आले आहे. हे कलेक्शन हिंदी, तमिळ आणि तेलुगूमधील आहे. जवाननं अशा प्रकारे कमाई केली तर हा चित्रपट पठाणचे रेकॉर्ड ब्रेक करेल असे बोलले जाते. पठाणचे लाईफ टाईम कलेक्श हे ५४३ कोटी इतके आहे. येत्या आठवड्यात काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

जवानचे दिग्दर्शन अॅटलीनं केले असून त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसादही मिळाला आहे. शाहरुखच्या जवाननं मोठा विक्रम केला असून त्याचे सारे श्रेय अॅटलीचे असल्याचे नेटकऱ्यांचे आहे. अॅटली हा आता भारतीय चित्रपट विश्वातील सर्वात मोठा दिग्दर्शक झाला आहे. त्याच्या नावाला मिळालेली चाहत्यांची पसंती खूप काही सांगून जाणारी आहे.

अॅटलीच्या जवाननं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. शाहरुखच्या याच वर्षी प्रदर्शित झालेल्या पठाण नावाच्या चित्रपटाला मोठी टक्कर देण्याचे काम जवाननं केले आहे. अशातच नयनताराच्या अशा आरोपांमुळे वेगळयाच चर्चेला सुरुवात झाले आहे. जवानच्या यशानंतर त्याचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. जवानमध्ये शाहरुख खान, विजय सेतुपति, नयनतारा, दीपिका पदुकोण आणि प्रियामणि यांच्या भूमिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी कायम राहणार का? जाणून घ्या आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Jammu Kashmir : ...तर काश्मीरमध्ये वेगळी स्थिती असती; उमर अब्दुल्लांकडून वाजपेयींची तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

SCROLL FOR NEXT