Nayanthara Vighnesh Shivan surrogacy controversy: सोशल मीडियावर नयनतारा आणि विघ्नेश शिवन काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. जुनमध्ये लग्न झाल्यानंतर त्यांनी काही दिवसांतच नयनतारानं दोन मुलांना जन्म दिला आहे. यानंतर तिनं केलेल्या सरोगसीवरुन तिच्यावर टीका करण्यात आली. तिनं सरोगसीच्या काही नियमांचे पालन केले नाही. असे सांगण्यात आले आहे. यानंतर तामिळनाडू सरकारनं तीन जणांचे पॅनल नियुक्त केले होते. त्यांचा अहवाल आता समोर आला आहे.
कोणताही नियम तोडलेला नाही...
त्या अहवालात असे म्हटले आहे की, सरोगसी आईनं नोव्हेंबर 2021 मध्ये एका जोडप्यासोबत करार केला होता. त्यानंतर यावर्षी मार्चमध्ये तिच्या उदरात भ्रुण ठेवण्यात आले. ऑक्टोबरमध्ये तिनं मुलाला जन्म दिला. भारतात कमर्शियल सरोगसी ही 2021 अॅक्टनुसार बॅन करण्यात आली आहे. तो गेल्या वर्षीपासून लागु करण्यात आला आहे. नयनतारा आणि विघ्नेशच्या टाईमलाईनकडे पाहता त्यांनी ज्यावेळी सरोगसीची प्रोसेस सुरु केली होती त्यावेळी ती सगळी प्रोसेस कायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे.
विघ्नेश आणि नयनताराच्या प्रकरणावर सुनावणीसाठी ज्या पॅनलची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी संबंधित रुग्णालयावर कडक ताशेरे ओढले आहेत. त्यांनी नयनताराचे रेकॉर्ड यासाठी ठेवले होते की, ते चुकीचे आहे. त्यामुळे वाद हा आणखीनच वाढला. गोंधळही झाला. याप्रकरणात आता रुग्णालयाला नोटीस पाठवण्यात आली आहे.
विघ्नेश आणि नयनतारानं याच वर्षी जुनममध्ये लग्न केलं. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाला बॉलीवूडमधील दिग्गज उपस्थित होते. रजनीकांत, शाहरुख खान, विजय सेतूपती, ए आर रहमान, सुर्या यांच्यासारखे सेलिब्रेटी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.