अंमलीपदार्थविरोधी पथकाने (NCB) दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा Sushant Singh Rajput मित्र सिद्धार्थ पिठानीला Siddharth Pathani अटक केली. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी सिद्धार्थला हैदराबाद इथून अटक केली. याआधीही अनेकदा एनसीबीकडून सिद्धार्थची चौकशी करण्यात आली होती. १४ जून २०२० रोजी मुंबईतल्या राहत्या घरी सुशांतचा मृतदेह आढळला. या प्रकरणात अंमली पदार्थांचे कनेक्शन समोर येताच एनसीबीनेही तपासाला सुरूवात केली. अंमली पदार्थाप्रकरणी एनसीबीने शुक्रवारी सिद्धार्थ पिठानी याला अटक केली. सिद्धार्थ याचा गेल्या आठवड्यात साखरपुडा झाला होता. सिद्धार्थच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. (ncb arrests Siddharth Pathani in the drugs case linked to Sushant Singh Rajputs death)
१४ जून रोजी सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा सिद्धार्थ सुशांतच्या घरी उपस्थित होता. सिद्धार्थ हा सुशांतचा जवळचा मित्र आणि रुममेट असल्याचं सांगितलं जातं. त्यासोबतच तो सुशांतचा क्रिएटिव्ह कंटेट मॅनेजर म्हणून काम करत होता.
याआधीही एनसीबीने तपासासाठी सिद्धार्थ पिठानी, रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, स्टाफ दिपेश सावंतसहीत काही लोकांना अटक केली होती. चौकशीदरम्यान सिद्धार्थने काही धक्कादायक खुलासे केले होते. दरम्यान, या प्रकरणी एनसीबीने मार्च महिन्यात न्यायालयात तब्बल ६० हजारहून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती यांच्यासह ३३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.