Neena Gupta refuses to give any advice to youth about Relationships esakal
मनोरंजन

Neena Gupta : 'मीच नेहमी चुकीच्या लोकांना डेट केलंय, तुम्हाला काय सांगू'? तरुणाईला खमक्या शब्दांत नीनाजींनी ऐकवलं

प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मुलाखतीतून आपल्या परखडपणाचा परिचय करुन दिला आहे.

युगंधर ताजणे

Neena Gupta refuses to give any advice to youth about Relationships : प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मुलाखतीतून आपल्या परखडपणाचा परिचय करुन दिला आहे. त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांनी त्यांचे उदाहरण देत युवकांना रिलेशनशिप विषयावर स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे.

तुम्ही मला जर नात्यांवर काही प्रतिक्रिया द्यायला सांगाल तर त्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही. असे नीना गुप्ता म्हणतात. मीच माझ्या आयुष्यात चुकीच्या माणसांना डेट केले आहे. त्यामुळे त्याविषयी मी खूप काही वेगळं सांगून जाईल. यावेळी नीनाजी यांनी त्यांच्या लेकीच्या पहिल्या लग्नाच्यावेळी केलेली चूक देखील कबूल केली. मसाबाचे पहिलं लग्न हे फिल्म निर्माता मधू मंटेनासोबत झाले होते.

राजस्थान निवडणुकीत महिला, सिलेंडर आणि जातीय मुद्दा.! (Rajasthan Assembly Election 2023 )

मसाबाला लग्न काही करायचे नव्हते. तिला करिअरमध्ये फोकस करायचा होता. तिला काही दिवस लिव इन रिलेशनशिपमध्ये देखील राहायचे होते. त्यावेळी मी लग्नावर अडून राहिले, त्यांचे लग्न लावून दिले. मात्र ते लग्न काही केल्या टिकले नाही आणि शेवटी व्हायचे तेच झाले. त्यांचा घटस्फोट झाला. असेही नीनाजी यांनी याप्रसंगी सांगितले.

मसाबा ही नीना गुप्ता आणि वेस्टइंडिजचे माजी क्रिकेटर व्हिव रिचर्डस यांची मुलगी आहे. नीना गुप्ता यांनी आता सीए विवेक मेहरा यांच्याशी लग्न केले आहे. नीनाजी यांनी त्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, एक पुरुष आणि स्त्री यांच्यात कोणतीही प्रेम भावना नसते. असते ते आकर्षण. त्यानंतरची प्रक्रिया प्रेम ही आहे.

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये देखील नीना गुप्ता यांनी फेमिनिझम आणि पुरुषी वर्चस्व यावर प्रतिक्रिया दिली होती. जे कुणी फेमिनिझमवर बोलतात ती गोष्ट अतिशय फालतू आहे. ज्यानं त्यानं आपला संघर्ष करत वेगळी ओळख निर्माण करावी असे माझे मत आहे. मी माझे आयुष्य हे स्वताच्या अटींवर जगले आणि त्यासाठीची किंमतही मोजली. लोकं तुमच्याविषयी काय बोलतात यापेक्षा तुम्हाला काय वाटते हे जास्त महत्वाचे आहे. असे नीनाजी यांचे मत आहे.

आपल्या पार्टनरचा आदर करणे, तुमच्यात संवाद असणे हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. तेच नसेल तर त्या नात्याला काही अर्थ नाही. मी तुम्हाला त्या गोष्टीविषयी मार्गदर्शन करण्यात योग्य व्यक्ती नाही. दुसरं म्हणजे आपण नेहमीच स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करतो. मला वाटते, जोपर्यत पुरुष प्रेग्नंट होत नाहीत तोवर आपल्याकडे स्त्री पुरुष समानता येणार नाही.

नीना गुप्ता यांच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्या यापूर्वी पंचायत नावाच्या वेबसीरिजमध्ये दिसल्या होत्या. त्यात त्यांनी मंजू देवीची भूमिका साकारली होती. ती कमालीची लोकप्रियही झाली होती. अॅमेझॉनवर ही मालिका प्रदर्शित करण्यात आली होती. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांमध्ये त्याचा समावेश होतो. त्यामध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, चंदन रॉय या कलाकारांनी भूमिका केल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Merger: बँकांचे होणार विलीनीकरण; 43 वरून 28 होणार संख्या, काय आहे सरकारचा प्लॅन?

Nashik News : ‘नाट्यचौफुला’ तून 8 तासांचा नाट्यानुभव; मराठी रंगभूमीच्या इतिहासातील यशस्वी उपक्रम

मी ते कधीही विसरू शकणार नाही... 'वास्तव'च्या सेटवर संजय दत्तने संजय नार्वेकरांना दिलेली अशी वागणूक; म्हणाले-

Prostate Cancer : प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? या गंभीर आजाराची कोणती आहेत लक्षणे? जाणून घ्या..

Jalna Assembly Election 2024 : जालना विधासनभा खोतकरांना रोखण्यासाठी भाजप मैदानात

SCROLL FOR NEXT