Neena Gupta calls feminism useless says women need men esakal
मनोरंजन

Neena Gupta : 'जेव्हा पुरुष प्रेग्नंट व्हायला लागतील तेव्हाच....', नीना गुप्ता स्पष्टच बोलल्या!

नीनाजी यांचे वैवाहिक आयुष्य, त्यातील वाद आणि त्यांचे वादळी आयुष्य हा त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा आणि प्रतिक्रियेचा विषय राहिला आहे.

युगंधर ताजणे

Neena Gupta calls feminism useless says women need men : बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता हा नेहमीच त्यांच्या बेधडक अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या सेलिब्रेटी आहेत. आपल्या वक्तव्यावर कोण काय म्हणेल यापेक्षा आपल्याला काय महत्वाचे वाटते यावर नीनाजी नेहमीच ठाम राहिल्या आहेत. आता त्या पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत.

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या नीनाजी यांनी त्यांचा प्रवास त्यांच्या आत्मचरित्रातून चाहत्यांसमोर ठेवला आहे. त्यावरुनही बराचसा वाद झाला होता. त्यातून त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे देखील केले होते. नीनाजी यांचे वैवाहिक आयुष्य, त्यातील वाद आणि त्यांचे वादळी आयुष्य हा त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा आणि प्रतिक्रियेचा विषय राहिला आहे. Neena Gupta calls feminism useless says women need men

Money and Mind पैसा हवाच पण मनाची श्रीमंती-समाजऋणाचे भानही हवे!

सध्या नीनाजींनी महिला सक्षमीकरण, पितृसत्ताकपद्धती आणि फेमिनिझम याविषयी रोखठोक भूमिका मांडली आहे. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या नेहमीच्या बिनधास्त शैलीत फेमिनिझम म्हणजे निव्वळ फालतूपणा असून महिलेला पुरुषाच्या आधाराची गरज भासतेच हे आपण लक्षात घ्यायला हवे. पुरुष हे काही कुणाला जन्म देऊ शकत नाही. आपल्याला निसर्ग काय सांगतो हे समजून घेण्याची गरज आहे. कुणाला कुणाची गरज आहे हे निसर्गानं सांगितलं आहे.

मला म्हणायचं आहे की आपण फेमिनिझमबाबत फालतूपणानं विचार करतो आहोत. प्रत्येकवेळी महिला या पुरुषांपेक्षा कशा वेगळ्या आहेत यावर चर्चा करण्यापेक्षा स्वतंत्रपणे आपला विकास करण्यावर आणि स्वताची वेगळी वाट कशी निर्माण करता येईल याचा विचार व्हायला हवा. तुम्ही एकमेकांचा आदर करा, संवाद ठेवा एकमेकांमध्ये प्रामाणिकपणा जोपासा सगळं काही ठीक होईल.

पुरुष आणि महिला हे काही एकसारखे नाहीत. ज्या दिवशी पुरुष प्रेग्नंट व्हायला लागतील तेव्हापासून आपल्याकडे स्त्री पुरुष समानता आली असे म्हणावे लागेल. अशा शब्दांत नीनाजींनी त्यांची भूमिका मांडली आहे. त्या मुलाखतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. तुम्ही आपल्याला एक चांगला माणूस व्हायचं आहे अशी भूमिका डोळ्यांसमोर ठेवली पाहिजे. त्या दृष्टीनं वाटचाल हवी. आपण त्याचा विचारच करत नाही.

मी खूप साऱ्या वेगळ्या परिस्थितीतून गेली आहे. माझी मुलगी मसाबा छोटी होती तेव्हा मी खूप चिंता करायची आपले कसे होणार, मसाबाला जेव्हा फोन करत असे तेव्हा ती अनेकदा फोन घेत नसे, त्यामुळे आणखी काळजी वाटायची. पहिल्यांदा जेव्हा माझे पती फोन करत नव्हते तेव्हा मला काळजी वाटत असे. पण त्यानंतर परिस्थिती बदलली. असेही नीनाजींनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

Marathwada: जातीयवाद , प्रांतवाद सोडून द्या अन हिंदूत्वासाठी एकत्र या; कालीचरण महाराजांचे आवाहन...

Mumbai Election: मुंबईत मतदारांची संख्या किती? आकडा वाचुन तुम्हालाही बसेल धक्का

SCROLL FOR NEXT